केसांच्या मजबुतीसाठी 'ही' पोषक तत्व करतात मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:41 PM2019-02-13T15:41:38+5:302019-02-13T15:50:14+5:30
अनेकदा आरोग्याच्या समस्यांमुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की नक्की केस गळण्याचं कारण काय असू शकतं?
अनेकदा आरोग्याच्या समस्यांमुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की नक्की केस गळण्याचं कारण काय असू शकतं? बऱ्याचदा दूषित पर्यावरण आणि खराब जीवनशैली यांसारख्या कारणांमुळे केसांच्या वाढिसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची कमतरता आढळून येते. परिणामी केस गळतात किंवा केस निर्जीव आणि कोरडे होतात. यामुळे केसांची वाढ खुंटते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्या आहारात काही बदल करणं आवश्यक असतं. ज्यामुळे केसांच्या वाढिसोबतच केसांची चमक परत मिळवण्यासही मदत होते.
प्रोटीन
केसांना तुटण्यापासून वाचवण्यासाठी प्रोटीनचा वापर करणं आवश्यक आहे. केसांमध्ये असणारी पोषक घटकांची कमी पूर्ण करण्यासाठी प्रोटीन मदत करतं. त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. केसांना सुंदर आणि दाट करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
ओमेगा 3
ओमेगा-3 फॅटी अॅसिड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओमेगा-३ फॅटी अॅसिड प्रामुख्याने मासे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्समध्ये मिळतात. याव्यतिरिक्त माशांचं तेलही केसांसाठी फायदेशीर ठरतं.
आयर्न
महिलांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता झाल्यामुळे अनिमियासोबतच केसांत्या इतर समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे शरीरासोबतच केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आयर्नची कमतरता भरून काढणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच पालक, आयर्न, व्हिटॅमिन ए, सी आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. पालकमध्ये फक्त आयर्नच नाही तर सेबमही असतं. जे केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनर करण्यासाठी मदत करतं. यामध्ये ओमेगा-3 अॅसिड, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि आयर्न असतं. यामुळे स्काल्प हेल्दी आणि केस सुंदर दिसण्यास मदत होते.
व्हिटॅमिन-डी
व्हिटॅमिन-डीचा उपयोग केल्याने केसांचे आरोग्य राखण्यासोबतच ते सुंदर, दाट आणि चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे व्हिटॅमिन-डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी मशरूम आि सॅल्मन माशांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
मॅग्नेशिअम
मॅग्नेशिअम केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच त्यांच्या वाढिसाठी मदत करतं. त्यामुळे आहारामध्ये पालक, ब्राउन राइस, ड्रायफ्रुट्स इत्यादी पदार्थांचं सेवन करणं आवश्यक असतं. झिंकमुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.