B'Day Special: कृति सेननच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:08 PM2018-07-27T12:08:23+5:302018-07-27T12:10:07+5:30
आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरूणी तिला फॉलो करतात, तर अनेक तरूणींना तिच्यासारखा फिगर हवा आहे. चला जाणून घेऊ कृति सेननच्या हॉट फिगरचं गुपित...
मुंबई : अभिनेत्री कृति सेनन आज तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २७ जुलै १९९० मध्ये दिल्लीत झाला होता. अनेकांना माहीत नसेल पण कृतिचं सिनेमातील करिअर एका तेलगु सिनेमातून झालं होतं. या सिनेमात तिचा हिरो महेश बाबू होता. पुढे तिने 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरूणी तिला फॉलो करतात, तर अनेक तरूणींना तिच्यासारखा फिगर हवा आहे. चला जाणून घेऊ कृति सेननच्या हॉट फिगरचं गुपित...
कृति फिगर मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते. यात जराही शंका नाही की, कृतिसारखी फिगर हवी असेल तर मेहनत करावी लागणार नाही. पण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या शरीराकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही.
कृति सुंदर असण्यासोबतच हेल्दी आणि फिटही आहे. फिगर स्लिम आणि फिट ठेवण्यासाठी तिच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. कृतिच्या वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. डान्स केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, कृति वर्कआऊटसोबतच आपल्या डाएटवरही खास लक्ष ठेवते. कृति आपल्या डाएटमध्ये डाळ-भात. उकळलेलं चिकन, चिकन सूप, सॅंडविच, खजूर, केळी, सफरचंद, काकडी आणि भाज्यांचा समावेश करते. ती रात्री फार हलके पदार्थ खाते.
कृतिनुसार, हेल्दी आणि फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट घेण्यासोबतच रोज वर्कआऊट करणेही गरजेचे आहे. नेहमी फिजिकल अॅक्टीविटी केल्या पाहिजेत ज्यात कार्डियो, वेट ट्रेनिंग आणि इतरही वर्कआऊटचा समावेश असावा.