रोज करु नये मेकअप; चेहऱ्यावर होतात हे ५ गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 10:04 AM2018-11-01T10:04:07+5:302018-11-01T10:04:29+5:30

अलिकडे महिला आता रोज मेकअप करण्याला प्राधान्य देत आहेत. पण रोज मेकअप केल्याने तुम्ही सुंदर तर दिसाल पण याने तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग प्रभावित होतो.

Harmful effects of applying makeup daily | रोज करु नये मेकअप; चेहऱ्यावर होतात हे ५ गंभीर परिणाम!

रोज करु नये मेकअप; चेहऱ्यावर होतात हे ५ गंभीर परिणाम!

Next

(Image Credit : SkinUp USA)

अलिकडे महिला आता रोज मेकअप करण्याला प्राधान्य देत आहेत. पण रोज मेकअप केल्याने तुम्ही सुंदर तर दिसाल पण याने तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग प्रभावित होतो. याने त्वचा आणि डोळ्यांना अनेक प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो. कारण मेकअपसाठी ज्या वस्तूंचा तुम्ही वापर करता, त्यात वेगवेगळे घातक केमिकल्स असतात आणि याचा रोज वापर केल्यास त्याने नुकसान होतं.

चेहऱ्यावर सुरकुत्या

रोज मेकअप केल्याने आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची रोमछिद्रे मोठी होतात. आणि याच छिद्रांमध्ये मेकअपसाठी वापरलेल्या क्रिमचे तत्व जमा होतात. हे पुढे पिंपल्स म्हणून बाहेर येतात. हे बॅक्टेरिया प्रदूषित हवेत मिसळतात. तसेच याने तुमच्या त्वचेच्या कोलेजनला नुकसान होतं. इतकेच नाही तर याने त्वचेवर नव्या पेशी तयार होण्यासही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. 

डोळ्यांच्या सौंदर्याचं नुकसान

काजळ लावल्याने डोळे भलेही आकर्षक होत असतील. पण जास्तवेळ काजळ लावून ठेवल्याने डोळ्यांना इन्फेक्शनचा धोका वाढतो. काजळामध्ये असलेल्या केमिकल्समुळे डोळ्यांना खाज येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर लावल्या जाणाऱ्या फाऊंडेशनने डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचाही सैल होऊ लागते.

त्वचेची लवचिकता नष्ट होते

आपल्या त्वचेची लवचिकता त्वचेला तजेलदार ठेवते. पण मेकअपमुळे ही लवचिकता कायम ठेवणाऱ्या पेशींचा नाश करतं. त्यामुळे तुमची त्वचा सैल होते आणि तुम्ही वृद्ध दिसू लागता. अशात मेकअप रोज न करता कधी कधीच करावे. आणखी एक नुकसान म्हणजे चेहऱ्यावर फाऊंडेशन लावल्याने त्वचा काळी पडू शकते.  

ओठ काळे होतात

ब्रॅंडेड नसलेली लिपस्टिक आणि प्रॉडक्टचा वापर केल्याने ओठांवर काळेपणा येऊ शकतो. लिपस्टिकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग नाहीसा होतो. जास्तवेळ लिपस्टिक लावून ठेवल्याने त्वचेवर सूज आणि पीलिंगही येऊ शकतं. त्यामुळे ओठांवर लिपस्टिकऐवजी लिप बाम किंवा नैसर्गिक उत्पादन लावा.

टिकलीमुळे डाग पडतो

चिकटणारी टिकली फार आधीपासून लावत असाल तर कपाळावर पांढरा डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे टिकली नेहमी चांगल्या क्वालिटीची लावा आणि फार जास्त वेळ लावून ठेऊ नका. तरी डाग पडला तरी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

Web Title: Harmful effects of applying makeup daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.