Health & Beauty : ​काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 06:45 AM2017-07-12T06:45:34+5:302017-07-12T12:15:34+5:30

बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये ​काकडीचा समावेश असतो. जाणून घ्या ​काकडीचे फायदे..!

Health & Beauty: Know the Health and Beauty Benefits of Cucumber? | Health & Beauty : ​काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?

Health & Beauty : ​काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?

googlenewsNext
वसाळ्यात सहज उपलब्ध होणारी ​काकडी आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये  ​काकडीचा समावेश असतो. कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. ​काकडीचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करु शकतो, जसे कोशिंबीर, ज्यूस, सॅँडवीच किंवा मीठ लावूनही सेवन करु शकता. ​काकडीमध्ये अगणित आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आहेत.  

Related image

* आयुर्वेदानुसार ​काकडी, पित्त, रक्त पित्त दूर करणारा तसेच रक्तविकार आणि मूत्र कच्छ नाशक रूचकर फळ आहे. ​काकडीच्या सेवनाने पोट आणि यकृताची जळजळ शांत होण्यास मदत होते.  

* पोटात जळजळ झाल्यास तोंडात दुर्गंधी निर्माण होते. मात्र ​काकडी सेवन केल्याने पोटात थंडावा निर्माण होतो आणि दुर्गंधीची समस्या दूर होते.  

* ​काकडीमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात नसतो. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. 

* ​काकडीमध्ये कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यासाठी दुपारी भूक लागल्याने ​काकडीचे सेवन केल्यास पोट उशिरापर्यंत भरलेले असते.  

* जर तोंडात दुर्गंधी येत असेल तर आपण काही वेळापर्यंत तोंडात ​काकडीचा तुकडा ठेवल्यास तोंडातील जीवाणू नष्ट होऊन हळुहळू तोंडाची दुर्गंधी दूर होते.  

Web Title: Health & Beauty: Know the Health and Beauty Benefits of Cucumber?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.