घामाच्या वासाला हैराण होऊन डिओड्रंट वापरत असाल तर 'असं' पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:51 PM2020-01-26T16:51:22+5:302020-01-26T16:54:05+5:30
स्टाईल म्हणून किंवा जीवनशैलीचा भाग म्हणून डिओड्रंटचा वापर सगळेच करतात.
स्टाईल म्हणून किंवा जीवनशैलीचा भाग म्हणून डिओड्रंटचा वापर सगळेच करतात. कारण घामाच्या वासाने त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या महागड्या कंपन्यांचे डिओड्रंट वापरले जातात. परफ्युम किंवा डियोमुळे तात्पुरतं का होईना दुर्गंधीपासून सुटका मिळत असली तरी याचे काही दुष्परिणाम सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. कारण जर डिओड्रंटच्या वापरामुळे होत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला हीच गोष्ट महागात पडू शकते. बाजारात अनेक डिओड्रंट स्प्रे, जेल आणि स्टिक रोल किंवा पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असतात. डिओड्रंटमध्ये असलेल्या एल्यूमिनीयममुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.
(Image credit- the list)
रोजच्या जीवनात सर्वाधिक लोकं डिओड्रंटचा वापर करतात. भारतासरख्या दमट हवामानाच्या देशात घामापासून वाचण्यासाठी सर्वाधिक डिओड्रंट खरेदी केले जातात. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार भारतात डिओड्रंटची बाजारपेठ सुमारे 3000 कोटींची आहे. 150 रुपयांपासून 10, 000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एंटीपर्सपिरेंट शरीरातून येत असलेल्या घामाला कंट्रोल करतो. घामाला रोखण्यासाठी यात एल्यूमीनियम क्लोरोहाइड्रेट मिसळले जाते.
यामुळे स्किन कॅन्सर होण्याचा धोका असतो. खास करून जर शेविंग केल्यानंतर याचा वापर केल्यास ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. कारण सर्वात जास्त डिओड्रंटचा वापर छाती आणि काखेत केला जातो. कारण डिओड्रंट असलेल्या केमिकलयुक्त एल्यूमिनीयम ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. अनेक प्रकारचे त्वचा रोग आणि एलर्जीचा सामना करावा लागू शकतो. (हे पण वाचा-केस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं)
यात वापरल्या जात असलेल्या एल्यूमिनीयममुळे अल्जायमर या आजाराचा धोका सुद्धा असू शकतो. अलजायमर हा एका प्रकारचा डिमेंशन असलेला आजार आहे. सर्वाधीक प्रमाणात वयाची ६० वर्ष पार केलेल्या लोकांना होत असतो. ही बाब जरी पूर्णपणे सिध्द झाली नसली तरी अजूनही संशोधन चालू आहे.
(image credit- she knows)
अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पॅराबेंन्स वापरले जातात. त्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका असतो. डियोड्रंटच्या वापरामुळे ब्रेस्ट टिश्यू प्रभावीत होत असतात. नॅचरल डियोड्रंट घामाला जास्त प्रमाणात रोखू शकत नाहीत. आर्टिफिशियल असतील तर केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यावर आधारीत कोणतेही ठोस संशोधन करण्यात आलेले नाही. पण तरी सुद्धा मोठ्या आजारांपासून वाचण्यासाठी पर्सनल प्रोडक्टसचा वापर काळजीपूर्वक करा. ( हे पण वाचा- तुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब)