मेहंदीमुळे केस कोरडे होण्याची शक्यता, करा 'हे' उपाय केस होतील स्मुद अँड सिल्की

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:59 PM2022-08-05T17:59:08+5:302022-08-05T18:04:11+5:30

वास्तविक, जेव्हा मेंहदी चांगल्या दर्जाची नसते तेव्हा असे होते. यावर काही पद्धतींच्या मदतीने आपण केसांचा कोरडेपणा सहज घालवू (Hair care tips) शकतो.

Hena can make your hair dry know the remedies | मेहंदीमुळे केस कोरडे होण्याची शक्यता, करा 'हे' उपाय केस होतील स्मुद अँड सिल्की

मेहंदीमुळे केस कोरडे होण्याची शक्यता, करा 'हे' उपाय केस होतील स्मुद अँड सिल्की

googlenewsNext

पांढऱ्या केसांची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. त्याचबरोबर केसांना डाय करण्यासाठी अनेक जण केसांना केमिकल वापरण्याऐवजी मेंहदी लावणे पसंत करतात. केसांना सुंदर रंग देण्यासोबतच केसांना निरोगी ठेवण्यासाठीही मेंहदी उपयुक्त ठरते. मात्र, अनेकदा मेहंदी लावल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. वास्तविक, जेव्हा मेंहदी चांगल्या दर्जाची नसते तेव्हा असे होते. यावर काही पद्धतींच्या मदतीने आपण केसांचा कोरडेपणा सहज घालवू (Hair care tips) शकतो.

बाजारात मिळणारी मेंहदी ही शक्यतो केमिकलयुक्त असते, ज्यामुळे आपले केस कोरडे आणि कडक होतात. आम्ही तुमच्यासोबत मेंदी लावण्यासाठी काही टिप्स शेअर करत आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही केसांना चांगला रंग देऊ शकता तसेच केस रेशमी आणि चमकदारही बनवू शकता.

आवळा वापरा
मेंहदी लावताना मेंहदीमध्ये आवळा पावडर किंवा आवळा तेल मिसळू शकता. आवळा केसांच्या डीप कंडिशनिंगसाठी काम करतो, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात. तसेच चांगल्या परिणामांसाठी आपण मेंदीमध्ये दही, अंडी आणि बदामाचे तेल देखील घालू शकता.

दह्याचा हेअर पॅक -
कोरडे केस मऊ करण्यासाठी आणि कोंडा घालवण्यासाठी, दह्याचा हेअर मास्क लावणे ही एक उत्तम कृती आहे. यासाठी 1 वाटी दह्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

केळीचा हेअर मास्क -
पोषक तत्वांनी युक्त केळी केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही केळीचा हेअर मास्क देखील वापरून पाहू शकता. यासाठी 1 केळीमध्ये एलोवेरा जेल आणि हेअर तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

अंड्याचा हेअर मास्क -
केस हेल्दी बनवण्यासाठी अंड्याचा हेअर मास्क लावणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी अंड्याचा पांढरा भाग फेटून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये मध, लिंबाचा रस आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा. ही पेस्ट केसांना लावा आणि 20 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा.

Web Title: Hena can make your hair dry know the remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.