चेह-यावरील काळ्या डागांमुळे हैराण आहात,हे घरगुती उपाय करुन पाहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 05:23 AM2017-11-07T05:23:00+5:302018-06-23T12:03:30+5:30

ताकामुळे चेह-याची चकाकी वाढते. त्वचेच्या सौंदर्यासाठी विविध प्रकाराच्या लेपांचाही वापर करण्यात येतो. काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप अधिक फायदेशीर ठरतो. हे

Here are some of the black marks on your face, take home remedies! | चेह-यावरील काळ्या डागांमुळे हैराण आहात,हे घरगुती उपाय करुन पाहा !

चेह-यावरील काळ्या डागांमुळे हैराण आहात,हे घरगुती उपाय करुन पाहा !

googlenewsNext
ल्यापैकी अनेकजण चेह-यावर पडणा-या काळ्या डागांमुळे हैराण असतात. उन्हात फिरल्याने चेह-यावर हे काळे डाग पडतात.चेह-यावर काही विशिष्ट ठिकाणी विशेषतः उंचवट्याच्या ठिकाणी जास्त कडद काळे डाग पडतात. हे डाग कसे घालवावे असे प्रश्न आपल्याला पडतात. वैद्यकीय उपचार घेण्याला कुणीही पसंती देत नाही. त्याऐवजी घरगुती उपाय अधिक उपयुक्त ठरतात. चेहरा तजेलदार आणि डागविरहित ठेवण्यासाठी पारंपरिक घरगुती उपाय आणि नैसर्गिक उपाय अधिक फायदेशी ठरतात. लिंबाचा रस, काकडी, मध, हळद, ताक, नारळ पाणी, बदाम यांचा वापर चेह-यावरील डाग घालवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी केला जातो.

लिंबाच्या रसाने चेह-याची कातडी निरोगी बनते.मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रणही उपयुक्त ठरते. दोन चमचे मधात थोडासा लिंबाचा रस मिसळून चेह-यावरील काळ्या गडद डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेह-यावर ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. त्यामुळे चेहरा अधिक तजेलदार बनतो. लिंबाचा नुसता रस वापरला तरी चालतो. विशेषतः हाताचे कोपरे आणि गुडघे काळे पडतात.त्याला लिंबाच्या रसाने मालिश करुन पंधरा मिनिटांनंतर तो भाग पाण्याने धुवून टाका. यामुळे ही त्वचा सामान्य होते. लिंबाचा रस,हळद आणि कच्चे दूध यांचं मिश्रण करुन तयार केलेली पेस्ट चेह-यावर लावावी. हा थर चेह-यावर सुकेपर्यंत ठेवावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.

हळद आणि चंदन यांच्या वापराबाबतही सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असते. इतकंच नाही तर साखरही औषधी आहे. चेहरा स्वच्छ धुण्यासाठी साखर उपयोगी पडते. ताकाबाबतही हीच बाब आहे. ताकामुळे चेह-याची चकाकी वाढते.त्वचेच्या सौंदर्यासाठी विविध प्रकाराच्या लेपांचाही वापर करण्यात येतो. काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप अधिक फायदेशीर ठरतो. हे मिश्रण दोनदा चेह-यावर लावावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस मिसळल्याने अधिक उपयोगी ठरु शकते.  

Web Title: Here are some of the black marks on your face, take home remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.