लिप बामचा असाही करता येतो वापर; 'हे' होतील फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 01:32 PM2018-10-20T13:32:16+5:302018-10-20T13:32:29+5:30
साधारणतः लिपबामचा वापर फाटलेले ओठ ठिक करण्यासाठी करण्यात येतो. याचा वापर कोरड्या केसांना मुलायम करण्यासाठी देखील करण्यात येतो. त्याचप्रमाणे पायांना पडलेल्या भेगा ठिक करण्यासाठीदेखील लिप बामचा वापर केला जाऊ शकतो.
साधारणतः लिपबामचा वापर फाटलेले ओठ ठिक करण्यासाठी करण्यात येतो. याचा वापर कोरड्या केसांना मुलायम करण्यासाठी देखील करण्यात येतो. त्याचप्रमाणे पायांना पडलेल्या भेगा ठिक करण्यासाठीदेखील लिप बामचा वापर केला जाऊ शकतो. ओठांव्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी लिप बामचा वापर केला जातो जाणून घेऊया लिप बामचे अनोखे फायदे...
शू-बाईट्सचा त्रास दूर करण्यासाठी
नवीन शूज किंवा सॅन्डल घातल्यानंतर पायांना शू-बाईट्सचा सामना करावा लागतो. अशावेळी ते शूज वापरण्याआधी पायांच्या बोटांना आणि टाचांना लिप बाम लावा. त्यामुळे पायांची शू-बाईट्सपासून सुटका होईल.
मेकअप म्हणून करा वापर
जर तुम्हाला आयब्रो करण्यासाठी वेळ नसेल तर हाताच्या बोटांच्या सहाय्याने लिप बाम आयब्रोवर लावा. त्यमुळे आयब्रोचा शेप व्यवस्थित दिसण्यास मदत होईल. त्याचबरोबर लिप बाम गालांवर लावल्याने गालांवर ग्लो येतो.
असा देखील करता येतो वापर
जर जीन्स किंवा इतर कोणत्याही वस्तूची चैन व्यवस्थित काम करत नसेल तर त्या चैनवर लिप बाम लावा. त्यामुळे चैन सतत अडकत नाही. त्याचप्रमाणे अंगठी हातात अडकली असेल तर थोडा सा लिप बाम लावून अंगठी हातातून बाहेर काढा.
कोरड्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी
बऱ्याचदा नखांच्या आजूबाजूची त्वचा निघू लागते. असावेळी त्यावर लिप बाम लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे नखं हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचा देखीन मुलायम होते. सर्दी झाल्यानंतर सतत रूमालाने नाक पुसल्याने नाकाजवळची त्वचा कोरडी होते. अशातच लिप बाम लावल्याने कोरड्या त्वचेपासून सुटका होते.