घरच्या घरी तयार करा कोरफडीचं जेल; त्वचा होईल तजेलदार आणि फ्रेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:59 PM2018-10-24T19:59:43+5:302018-10-24T20:03:14+5:30
कोरफडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही कोरफडीचा उपयोग करण्यात येतो. त्याचप्रमाणे कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत.
कोरफडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही कोरफडीचा उपयोग करण्यात येतो. त्याचप्रमाणे कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. कोरफडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-फंगल आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल गुमधर्म असतात. जे त्वचेचं अनेक बॅक्टेरियांपासून रक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
कोरफडीचा गर अनेक त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर ठरत असून हा बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो. पण बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्वचेला इजाही होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून खरेदी करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोरफडीचं जेल तयार करू शकता.
घरच्या घरी तयार करा कोरफडीचं जेल :
- सर्वात आधी कोरफडीच्या झाडाची पानं तोडून आणा.
- त्यानंतर पाण्याने धुवून स्वच्छ करा.
- बाजूच्या कडा कापून त्यातील गर चमच्याच्या सहाय्याने काढून घ्या.
- आता मिक्सरच्या सहाय्याने त्याची प्युरी तयार करा.
- मिक्सरमध्ये प्युरी करताना त्यामध्ये पानाचा एकही तुकडा येणार नाही याची खात्री करा.
- गरज असल्यास त्यामध्ये व्हिटॅमिन-ई तेल किंवा व्हिटॅमिन-सी पावडर घालू शकता.
- जर तुम्हाला सुगंधी जेल तयार करायचे असल्यास त्यामध्ये गुलाब पाणी मिसळू शकता.
- मिक्सरमध्ये फक्त एकदाच हे जेल फिरवा, जर जास्त वेळ फिरवलं तर हे फार चिकट होतं.
- जास्त प्रमाणात जेल तयार करायचं असेल तर त्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-ई आणि गुलाब पाणी मिसळा.
- तुमचं होम मेड कोरफडीचं जेल तयार आहे.
- होममेड जेलचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होईल.