Beauty Tips : मेकअप खराब केल्याशिवाय अशी रिअप्लाय करा सनस्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:47 PM2019-03-22T12:47:54+5:302019-03-22T12:48:45+5:30

सध्या वातावरणामध्ये हळूहळू बदल जाणवत असून उन्हाचा जोर वाढत आहे. अशातच सुर्याच्या प्रखर किरणांचा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवरही परिणाम होत असतो.

Here is how to reapply sunscreen on makeup | Beauty Tips : मेकअप खराब केल्याशिवाय अशी रिअप्लाय करा सनस्क्रिन

Beauty Tips : मेकअप खराब केल्याशिवाय अशी रिअप्लाय करा सनस्क्रिन

Next

(Image Credit : rd.com)

सध्या वातावरणामध्ये हळूहळू बदल जाणवत असून उन्हाचा जोर वाढत आहे. अशातच सुर्याच्या प्रखर किरणांचा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवरही परिणाम होत असतो. अशातच उन्हापासून आणि सुर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी ब्युटी अक्सपर्ट्स आपल्याला सनस्क्रिनचा वापर करण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे आपल्याला माहितच आहे की, घरातून बाहेर पडताना त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी सनस्क्रीन वापरणं अत्यंत आवश्यक असतं. मग तुम्ही SPF असणाऱ्या मेकअपचा वापर केलात तरिही त्याआधी सनस्क्रिन लावणं अत्यंत गरजेचं असतं. 

सनस्क्रिन त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून रक्षण करते आणि टॅनिंगपासून बचाव करते. त्याचबरोबर ड्राय स्किन आणि बर्निंगपासूनही बचाव करते. याव्यतिरिक्त वेळेआधीच त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्याचंही काम करते. त्यामुळे तुम्हाला कामासाठी सतत बाहेर थांबावं लागत असेल तर तुमच्या मेकअप किटमध्ये सनस्क्रिन असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय जर तुम्हाला उन्हामध्ये दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबण्याची गरज असेल तर काही वेळाने चेहऱ्यावर सनस्क्रिन पुन्हा लावण्याची गरज असते. 

आपल्यापैकी अनेकांना सतत एक प्रश्न सतावत असतो की, जर तुम्ही मेकअप केला असेल तर त्यावर सनस्क्रिन लावू शकतो का? किंवा कशी लावावी? त्यासाठी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होण्यास मदत होईल. 

जर तुम्हाला उन्हामध्ये 2 तासांपेक्षा जास्त वेळ रहावं लागत असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने सनस्क्रिन पुन्हा लावू शकता. त्यासाठी तुम्हाला ब्लेंडरवर थोडंसं सनस्क्रिन घेऊन ते संपूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड करायचं आहे. पम लक्षात ठेवा चेहऱ्यावर चोळून सनस्क्रिन लावू नका. असं केलं तर मेकअप खराब होतो. फक्त सनस्क्रिन घ्या आणि अलगद चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा सनस्क्रिन अब्जॉर्ब करेल आणि त्यामुळे फाउंडेशन खराबही होणार नाही. 

त्यानंतर तुम्ही ब्लश किंवा ब्रॉन्जरने टचअप करू शकता. कारण सनस्क्रिन लावल्यानंतर हे हलकं होऊ शकतं. त्यामुळे सनस्क्रिन लावल्यानंतर थोडसं टचअप करायला विसरू नका. यामुळे सुर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव होईलच पण त्यामुळे तुमचा मेकअपही बिघडणार नाही. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Here is how to reapply sunscreen on makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.