Holi Special : रंग खेळताना डोळ्यांची आणि कानांची काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:32 AM2019-03-18T10:32:59+5:302019-03-18T10:33:26+5:30

धुलिवंदनला रंग खेळण्याआधी आणि रंग खेळून झाल्यावर जितकी केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त काळजी डोळ्यांची आणि कानांची घ्यावी लागते.

Holi 2019: Know how to keep eyes, ear and mouth safe from colors during holi | Holi Special : रंग खेळताना डोळ्यांची आणि कानांची काळजी कशी घ्याल?

Holi Special : रंग खेळताना डोळ्यांची आणि कानांची काळजी कशी घ्याल?

Next

(Image Credit : Lenskart Blog)

धुलिवंदनला रंग खेळण्याआधी आणि रंग खेळून झाल्यावर जितकी केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त काळजी डोळ्यांची आणि कानांची घ्यावी लागते. कारण हे दोन्ही अंग आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अंगांमधील आहेत. जर चुकूनही कानात किंवा डोळ्यात रंग गेला तर 'रंगाचा भंग' व्हायला वेळ लागत नाही. 

रंग खेळताना डोळे आणि कान सुरक्षित ठेवले पाहिजेत. तसं पाहिलं तर रंग खेळण्याच्या उत्साहात असं करणं कठीण होतं. पण म्हणूनच आम्ही काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही डोळे आणि कान सुरक्षित ठेवू शकाल.

१) सर्वातआधी तर तुम्ही नैसर्गिक रंगांचा वापर करावा. केमिकलयुक्त रंगांचा वापर केल्याने डोळ्यांचं आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. केमिकलयुक्त रंगाने डोळ्यांना इजा होऊ शकते. तसे नैसर्गिक रंगही डोळ्यात जाऊ नये. डोळ्यात रंग गेलाच तर डोळ्यांवर पाणी मारा आणि डोळे चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. हे करताना डोळे अजिबात चोळू नका.

२) जर कुणाला रंग खेळायचा नसेल तर त्याच्यासोबत जबरदस्ती करू नका. जबरदस्ती करताना रंग डोळ्यात जाऊ शकतो. त्यामुळे बरं होईल की, कुणालाही रंग लावण्याआधी त्या व्यक्तीला सांगावं, त्याला तयार राहण्यास सांगावं. 

३) रंग खेळताना कॉन्टॅक्ट लेन्स अजिबात वापरू नका. असे केल्यावर कॉन्टॅक्ट लेन्सवर रंग चिकटू शकतो. त्यानंतर डोळ्यात जळजळ आणि रुतल्यासारखं होऊ शकतं. 

४) रंग खेळताना हाताने किंवा इतरही कशाने डोळ्यांना स्पर्श करू नका. सतत हाच प्रयत्न करा की, डोळ्यात रंग जाऊ नये.

५) कितीही काळजी घेऊनही डोळ्यात रंग गेला तर लगेच स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. डोळे चोळू नका. डोळे धुण्यासाठी जास्त थंड किंवा जास्त गरम पाणी वापरू नका. पूर्ण रंग डोळ्यातून दूर होईपर्यंत पाण्याने धुवत रहा. त्यानंतरही डोळ्यात जळजळ होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

६) रंग खेळताना तुम्ही सनग्लासेस वापरू शकता, जेणेकरून डोळ्यात रंग जाऊ नये. पण रंग लावताना धक्काबुक्की दरम्यान सनग्लासेसमुळे डोळ्यांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. 

रंगांपासून कानाची सुरक्षा

जेव्हा कानांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेचा विषय येतो तेव्हा अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. खासकरून होळीदरम्यान. रंगांचे वेगवेगळे दुष्परिणाम त्वचेवर, केसांवर होऊ नये म्हणून वाट्टेल ते उपाय केले जातात. पण कानांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात कानांची सुरक्षा करायची असेल तर कानात तेल टाका. ऑलिव्ह किंवा सरसो तेलाचे काही थेंब कानात टाका आणि वरून कॉटन लावा. कॉटन फार आत जाईल असा लावू नका. 
 

Web Title: Holi 2019: Know how to keep eyes, ear and mouth safe from colors during holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.