Holi special : होळीच्या रंगांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी ऑइल वॅक्स ठरतं फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:34 PM2019-03-18T13:34:52+5:302019-03-18T13:37:12+5:30
ब्युटी केयरमध्ये प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत राहतं. या सर्व गोष्टींचा उद्देश असतो तो म्हणजे, त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांची ओळख करून देणं.
(Image Credit : Contours Day Spa)
ब्युटी केयरमध्ये प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत राहतं. या सर्व गोष्टींचा उद्देश असतो तो म्हणजे, त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांची ओळख करून देणं. आता होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसं पाहायला गेलं तर हा रंगांचा सणं. यावेळी त्वचेची फार काळजी घेणं आवश्यक असते. रंग खेळण्याच्या आधी आणि रंग खेळल्यानंतर दोन्ही वेळेस त्वचेला एका खास ट्रिटमेंटची गरज असते. अशातच एक नवीन ट्रिटमेंट आहे ऑइल वॅक्स. जाणून घेऊया की, काय आहे ही ट्रिटमेंट आणि त्वचेसाठी कशी ठरते फायदेशीर...
त्वचेसाठी परिणामकारक...
ऑइल वॅक्स नॉर्मल वॅक्सपेक्षा जास्त परिणामकारक ठरतं. यामुळे त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासोबतच त्वचा उजळण्यासही मदत होते. खासकरून जेव्हा त्वचेवर खूप रंग पडतात. त्यावेळी रॅशेज आणि ड्रायनेसपासून बचाव करण्यासाठी ऑइल वॅक्स एका ट्रिटमेंटप्रमाणे काम करतं.
काय आहे ऑइल वॅक्स?
नॉर्मल वॅक्स साखर आणि ग्लिसरीनच्या मिश्रणाने तयार करण्यात येतं. पण ऑइल वॅक्स ऑइल बस्ड असतं. यामध्ये अनेक प्रकारच्या हर्बल तेलांचा वापर करण्यात येतो. वॉटर बेस्ड नॉर्मल वॅक्सिंग करताना त्वचेवर पावडर लावून गरम वॅक्स अप्लाय करण्यात येतं. पण ऑइल वॅक्स करताना सर्वात आधी त्वचेवर लेव्हेंडर, ऑलिव्ह ऑइल किंवा जॅस्मिन ऑइल लावण्यात येतं. तसेच हेयर रिमूव्ह करण्याआधी छोट्या स्ट्रिप्सचा वापर करण्यात येतो.
ब्राझीलियन वॅक्स आणि अमेरिकन वॅक्सपेक्षाही उत्तम
स्किनच्या शायनिंगसाठी ऑइल वॅक्स लेटेस्ट ट्रेन्ड आहे. या नव्या पद्धतीवे हेयर रिमूव्ह करण्यासोबतच स्किनवर शाइन आणण्यासाठी मदत होते. ब्युटी एक्सपर्ट याला ब्राझीलियन वॅक्स आणि अमेरिकन वॅक्सपेक्षा उत्तम मानतात. खरं तर ब्राझीलियन वॅक्स फेस आणि लिप्स वरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी करण्यात येतं. हे 100 आणि 200 ग्रॅम पॅक्सवर उपलब्ध असतं. यामध्ये छोट्या स्ट्रिप्स वापरून हेयर रिमूव्ह करण्यात येतात. तेच अमेरिकन वॅक्सिंग करताना तीन इंच मोठ्या स्ट्रिप्सचा वापर करण्यात येतो.
रंग खेळल्यानंतर करा ऑइल वॅक्स
त्वचा चमकदार आणि तजेलदार करण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही रंग खेळल्यानंतर ऑइल वॅक्स करा. यामुळे त्वचेवरील रंग निघून जाण्यासोबतच स्किनवरील डेड स्किनही निघून जाते. यामुळे त्वचेला एक वेगळी चमक मिळते. तसेच चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरते.
महाग नाही ऑइल वॅक्स
नवीन सौंदर्य उत्पादनांबाबत असं म्हटलं जातं की, ते फार महाग असतील. पण असं अजिबात नाही. ऑइल वॅक्स नॉर्मल वॅक्सपेक्षा महाग नसते. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी एवढा खर्च करणं फायद्याचंच ठरतं.