Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:31 PM2019-03-19T18:31:15+5:302019-03-19T18:32:40+5:30
होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. खासकरून हातांचा रंग सोडवणं फार अवघड असतं. कारण रंग खेळताना नखं आणि हातांचा रंग अनेक उपाय करूनही जाता जात नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही हातांना आणि नखांना लागलेला रंग सहज काढून टाकू शकता.
- होळी खेळण्याआधी व्यवस्थित तयारी करून घ्या. त्यानंतर रंग काढून टाकण्यासाठी मदत होईल. हातांना मोहरीचं तेल आणि नखांच्या आसपास व्यवस्थित वॅसलिन लावून घ्या. मुली नखांवर नेलपेंट लावू शकता.
- होळी खेळल्यानंतर हातांना लागलेला रंग दूर करण्यासाठी लिंबू कापून हातांवर मसाज करा. लिंबामध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे रंग हळूहळू निघून जातो. लिंबाचा रस लावून 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा त्यानंतर कोरड्या कपड्याने कलर स्वच्छ करा.
- हातांवर वॅसलिन लावून शॅम्पूच्या मदतीने हात स्वच्छ करा. तसेच रंग काढून टाकण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
- बेसनाच्या मदतीने हातांना स्क्रब करा.
- हातांचा रंग सोडवण्यासाठी व्हिनेगरचाही वापर करू शकता. फिंगर बाउलमध्ये व्हिनेगरसोबत थोडं पाणी एकत्र करा. त्यामध्ये 10 मिनिटांसाठी हात बुडवून ठेवा. तरिही रंग पुन्हा गेला नाही तर ही क्रिया पुन्हा करा.
- नखांवरील रंग सोडवण्यासाठी नखांवर आमचूर पावडर टाकून टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.