तेलकट त्वचेमुळे सतत काळपटपणा येतो? कमी खर्चात 'या' घरगुती उपायांनी उजळेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:23 AM2020-02-02T11:23:17+5:302020-02-02T11:32:51+5:30

महिलाच नाही तर पुरूषांच्या त्वेचेवर सुद्धा तेलकटपणा आल्यामुळे संपूर्ण लूक खराब होतो.

Home remedies for black and oily skin | तेलकट त्वचेमुळे सतत काळपटपणा येतो? कमी खर्चात 'या' घरगुती उपायांनी उजळेल त्वचा

तेलकट त्वचेमुळे सतत काळपटपणा येतो? कमी खर्चात 'या' घरगुती उपायांनी उजळेल त्वचा

Next

(image credit- allure.com)

महिलाच नाही तर पुरूषांच्या त्वेचेवर सुद्धा तेलकटपणा आल्यामुळे संपूर्ण लूक खराब होतो. तसचं जर तुम्ही कोणतीही क्रिम अप्लाय केली असेल किंवा मेकअप केला असेल तर तेलकटपणामुळे त्वचा जास्त खराब दिसायला लागते.  अनेक उपाय करून आणि बाजारातल्या महागड्या क्रिम्स वापरून सुद्धा हवी तशी त्वचा मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही हवी तशी त्वचा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही खर्च करावा लागणार नाही. घरी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही  सुंदर त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय.


बेसन

बेसन आपल्या सगळ्यांचाच स्वयंपाक घरात हमखास असतं. त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब जल घालुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण त्वचेवर लावून वीस मिनिटं ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. ह्या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहतात. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.


बेसनाचा वापर स्क्रब म्हणून करून त्वचेवरील मृत पेशी हटविता येतात. ह्या साठी तीन चमचे बेसनामध्ये एक चमचा ओट्स घालून, त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोर आणि आवश्यकतेप्रमाणे दुध घालावे. हे मिश्रण हळुवार हाताने चोळत त्वचेवर लावावे. दहा मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर राहू देऊन त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा.

पुदीना

पुदीन्यामुळे त्वचेला थंड वाटतं. तसेच याने पिंपल्सची तसंच तेलकटपणाची समस्याही कमी होते. त्यामुळे अनेक महिला मिंट मास्कचा वापर करतात. पुदीन्याचा आहारात समावेश करण्यासोबतच मास्क म्हणूणही वापर करा. मिंट मास्क तयार करण्यासाठी पुदीन्याची ताजी पाने घ्या आणि ते पाण्यात टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या ठिकाणांवर लावा. मास्क चांगल्याप्रकारे सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा प्रयोग केल्यास काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

मुलतानी माती

मुलतानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. तुमची त्वचा तेलकट असेल्यास, तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. ( हे पण वाचा-चामखीळीमुळे त्वचेचा लूक खराब झालाय? 'हे' उपाय वापरून चामखीळ करा दूर)

मसूरची डाळ

त्वचेचा तेलकटपणा घालवण्यासाठी  मसुराची डाळ वापरू शकता. यासाठी रात्रभर मसुरची सोललेली डाळ भिजत घालून सकाळी ती वाटून घ्यावी. यात किंचित गुलाबपाणी घालून हलक्या हाताने चेहऱ्याला लावावी. यावेळी वरच्या बाजूने मसाज करत चेहऱ्याच्या तेलकट भागांवर हापॅक नीट चोळून घ्यावा. यामुळे तेलकट पणा कमी होऊन चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते. ( हे पण वाचा-पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा)

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Home remedies for black and oily skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.