हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:32 PM2018-09-25T12:32:36+5:302018-09-25T12:33:00+5:30
हात आपल्या पर्सनॅलिटीचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं असतं. कोरडे आणि रखरखीत हातांमुळे सौंदर्यामध्ये अडथळे निर्माण होतात. हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत.
हात आपल्या पर्सनॅलिटीचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं असतं. कोरडे आणि रखरखीत हातांमुळे सौंदर्यामध्ये अडथळे निर्माण होतात. हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. परंतु त्या सर्वांमध्ये अनेक केमिकल्स आढळून येतात. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते. अशातच घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. आज जाणून घेऊयात काही असे घरगुती उपचार जे हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतात.
1. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये 1 चमचा साखर मिक्स करा. या पेस्टने हातांवर स्क्रब करा आणि 15 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. यामध्ये असलेली पोषक तत्व हातांची त्वचा कोमल आणि मुलायम करण्यासाठी तसेच उजळवण्यासाठी मदत करतात.
2. 2 चमचे बेसनामध्ये 1 चमचा दही मिक्स करा आणि हातांवर लावून 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर हात धुवून टाका. हातांची त्वचा उजळलेली दिसेल.
3. 2 चमचे बटर आणि 1 चमचा बदामाचं तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर हातांवर लावून 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा. बटर आणि बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा लवचिक होण्यास मदत होते.
4. 1 चमचा साखरेमध्ये लिंबाचे काही थेंब मिक्स करा. या मिश्रणाने हातांवर स्क्रब करा. 15 मिनिटं तसंच ठेवल्यानंतर कोमट पाण्याने हात धुवून घ्या. यामुळे हातांवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच डेड स्कीन सेल्स निघून जातील.