काय आहे त्वचेवरील मेलाज्मा? या घरगुती टिप्सने करा उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:33 PM2018-08-28T12:33:25+5:302018-08-28T12:38:57+5:30
त्वचेवर मेलाज्माचे निशाण गालांच्या वरच्या भागात, वरचा ओठ, कपाळ आणि हनुवटीवर अधिक येतात. महिलांमध्ये ही समस्या २० ते ५० वर्ष या वयादरम्यान अधिक आढळते.
(Image Credit : aestheticaskinhealthandwellness.com)
मेलाज्मा हे चेहऱ्यावर पडणारे बारीक बारीक काळे डाग असतात. हे चेहऱ्यावर सगळीकडेच येतात. काळे नसेल तर चेहऱ्यावर निळे किंवा ग्रे रंगांचे डाग येतात. हे डाग अनेक महिलांच्या गर्भावस्थेतही दिसतात. त्वचेवर मेलाज्माचे निशाण गालांच्या वरच्या भागात, वरचा ओठ, कपाळ आणि हनुवटीवर अधिक येतात. महिलांमध्ये ही समस्या २० ते ५० वर्ष या वयादरम्यान अधिक आढळते. ही समस्या पुरुषांनाही होऊ शकते. पण अशी फार कमी उदाहरणं आहेत. हे डाग काही घरगुती उपयांनीही दूर केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...
लिंबाचा रस
(Image Credit : trueskincarecenter.com)
लिंबामध्ये अॅसिडीक गुण असतात. जे त्वचेवरील डागांचा रंग हलका करण्यासाठी फायदेशीर आहे. लिंबाच्या रसातील आम्लं पदार्थांमुळे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत होते. मेलेज्माचे डाग दूर करण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावा आणि तीन मिनिटे त्यावर मालिश करा. तीन आठवडे दोन वेळा हा उपाय करा. फायदा नक्की दिसेल.
अॅप्पल सायडर व्हिनेगर
(Image Credit : www.healthline.com)
यात अॅसिटीक अॅसिड असतं. याला एक प्रभावी ब्लिचिंग एजंटही मानलं जातं. जे डाग दूर करण्यास मदत करतात आणि त्वचा अधिक चमकदार करतात. अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण डागांवर लावा. याने तुम्हाला काही दिवसात फायदा दिसू शकतो.
हळद
हळदीमध्ये अनेक आरोग्यदायी गुण असतात आणि त्याचा त्वचेच्या समस्येसाठी फायदाही होतो. हळद त्वचेच्या मेलेनिनला कमी करु शकते आणि मेलाज्माशी लढा देऊ शकते. एक जाड पेस्ट तयार करण्यासाठी १० चमचे दुधात ५ चमचे हळद पावडर घाला. हे मिश्रण त्या डागांवर लावा. त्यानंतर काही वेळाने त्वचा धुवा.
कांद्याचा रस
(Image Credit : www.inlifehealthcare.com)
त्वचेचा नैसर्गिक रंग परत मिळवण्यासाठी कांद्यांचा रस फार फायदेशीर आहे. कांद्यामध्ये असे काही तत्व असतात जे त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्यासोबतच कांद्याचा रस त्वचेच्या पेशींना पोषण देतात. कांद्याचा रस अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये समान प्रमाणात मिश्रित करा आणि डागांवर लावा. काही वेळाने त्वचा धुवा याने फायदा दिसेल.