चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:49 PM2020-08-28T20:49:17+5:302020-08-28T20:52:31+5:30

चारोळीत अनेक औषधी गुणधर्म असतात.  

Home remedies for preventing dark spots and pigmentaton | चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

googlenewsNext

वाढत्या वयात अनेकांना त्वचेवर डाग आणि पिंगमेंटेशनची समस्या उद्भवते. प्रदुषण, ताण-तणाव यांचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्वचेवर काळे पांढरे डाग किंवा पिंपल्स असतील तर त्वचा खराब दिसते. अनेकदा पार्लरच्या ट्रीटमेंट घेऊन तसंच महागड्या क्रिम्स वापरूनही त्वचेवर हवातसा ग्लो येत नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी उपलब्ध असलेल्या चारोळीचा वापर करून कशाप्रकारे त्वचा सुंदर बनवता येईल याबाबत सांगणार आहोत. 

चारोळीत अनेक औषधी गुणधर्म असतात.  चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि त्वचेसाठी फायदेशीर घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो.  

त्वचेवरील पिंगमेंटेशन कमी करण्यासाठी चारोळीचं तेल ऑलिव्ह ऑईलसोबत एकत्र करा. दिवसातून दोनवेळा हे तेल आपल्या त्वचेवर लावल्यानं चांगला परिणाम दिसून येईल. ज्या लोकांना कफ पित्ताचा त्रास असतो त्यामुळे त्वचेतून विषारी घटक  बाहेर येत असतात. चारोळीच्या वापराने त्वचेच्या समस्या नियंत्रणात येण्यास मदत होते. चारोळीचे चूर्ण करून ठेवल्यासही फायदेशीर ठरेल.  चारोळीचे तेल तुम्ही बदामाच्या तेलातही मिसळून लावू शकता. 

चारोळीचे चूर्ण करून  गुलाबजल किंवा दूधासोबत एकत्र करा. त्वचेवरील डाग असलेल्या भागांना २० ते ३० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. याशिवाय रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.  शारीरिक कमकुवतपणा दूर करण्यास चारोळी मदत करते. डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे लाभदायक ठरतात. 

हे पण वाचा-

त्वचेवरील सक्रिय किटाणूंमुळे पाठीवर दाण्यांसारखे डाग पडतात; 'या' घरगुती उपायांनी ठेवा दूर

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

Web Title: Home remedies for preventing dark spots and pigmentaton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.