डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्याचे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 01:11 PM2018-08-02T13:11:59+5:302018-08-02T13:12:38+5:30

शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास, कमी झोप घेणे, मानसिक तणाव किंवा फार जास्तवेळ कम्प्युटरसमोर काम करणे या कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात.

Home remedies to remove dark circles in the eye! | डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्याचे घरगुती उपाय!

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्याचे घरगुती उपाय!

Next

(Image Credit: www.deccanchronicle.com)

डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कलमुळे व्यक्तींचं सौदर्य बिघडतं. ही अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. डोळ्यांखाली काळे डाग येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास, कमी झोप घेणे, मानसिक तणाव किंवा फार जास्तवेळ कम्प्युटरसमोर काम करणे या कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. याने सुंदरता कमी होते सोबतच व्यक्ती थकल्यासारखा आणि वयोवृद्ध दिसतो. पण यावर काही घरगुती उपायांनी मात केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ काही घरगुती उपाय...

टोमॅटो

टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस, थोडं बेसन आणि हळद घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळा असे केल्यास तुम्हाला फायदा जाणवेल. 

बटाटे

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटे हा फार चांगला उपाय मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर बटाट्याचे स्लाइस करुन ते डोळ्यांवर २० ते २५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पुन्हा चेहरा पाण्याने धुवा. 

गुलाब जल

गुलाब जलच्या मदतीनेही डार्क सर्कल दूर केले जाऊ शकतात. डोळे बंद करुन गुलाब जलने भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. हे केवळ १० मिनिटांसाठी करा. असे केल्याने डोळ्यांजवळील त्वचा चमकदार होइल. 

बदाम तेल

डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बदामाचं तेलही उपयोगी आहे. बदामाचं तेल डोळ्याच्या आजूबाजूला लावून काही वेळ तसेच ठेवा. नंतर बोटांनी १० मिनिटे हळूहळू मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा. 

चहाचं पाणी

चहाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि नंतर थंड होऊ द्या. नंतर रूईच्या मदतीने ते पाणी डोळ्याच्या आजूबाजूला लावा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवा. हे काही दिवस केल्याने डोळ्याखालील काळे डाग दूर होतील.

टी बॅग

डार्क सर्कल दूर करण्यासाठी वापरलेल्या टी बॅगचाही उपयोग केला जाऊ शकतो. चहामध्ये असलेल्या टॅनिन या तत्वामुळे डोळ्यांना आलेली सूज आणि डोळ्याखालील डार्क सर्कल दूर होतात. 
 

Web Title: Home remedies to remove dark circles in the eye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.