दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी करा हे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 10:33 AM2018-06-30T10:33:27+5:302018-06-30T10:34:13+5:30
वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो.
(Image Credit: www.apollopharmacy.in)
मुंबई : अनेकजण मिशी आणि दाढीच्या पांढऱ्या केसांमुळे वैतागलेले असतात. हे केस काढण्यासाठी काही लोक वेगवेगळे घरगुती उपायही करतात. पण हे दाढी किंवा मिशीचे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो. त्यासोबतच तणाव, चुकीचं खाणं-पिणं, आजारी असणे आणि वृद्धापकाळ यानेही केस पांढरे होतात. मिशी आणि दाढीचे केस पांढरे झाल्याने तुम्ही अधिक वयस्कर दिसू लागता. अशात या पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काही खास उपाय पाहूयात.
डाळ आणि बटाट्याची पेस्ट
या आयुर्वेदिक उपचाराने तुम्ही मिशी आणि दाढीच्या पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकता. बटाटे आणि डाळीची पेस्ट पांढरे केस दूर करण्यात फायदेशीर ठरतात. बटाट्यामध्ये ब्लीचिंगचे नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे डाळीमध्ये बटाट्याची पेस्ट टाकून केसांना लावल्यास केसांचा नैसर्गिक रंग पुन्हा येतो.
तुरटी आणि गुलाबजल
तुरटी आणि गुलाबजलचं मिश्रण मिशी आणि दाढीच्या केसांना लावल्यास केसांचा रंग परत मिळवता येतो. यासाठी तुरटी आणि गुबालजल मिश्रित करुन दाढीच्या केसांवर लावा.
हळदही ठरते फायद्याची
हळद जवळपास त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी फायद्याची आहे. यात असलेल्लाय अॅंटीसेप्टिक आणि अॅंटी बॅक्टेरिअर गुणांमुळे केसांची वाढ रोखता येते.
कच्ची पपई
कच्ची पपई त्वचेच्या समस्या आणि नको असलेले केस दूर करण्यासाठी फायद्याची आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पपई तुमच्यासाठी फारच उपयोगी ठरु शकते. पपईतील पपेन नावाचं तत्व केसांची वाढ रोखतो. त्यासोबतच त्वचेतील मृत कोशिकांना दूर करते.
गुलाबजल आणि मूगाची डाळ
जर तुम्ही गुलाबजल आणि मूग डाळीची पेस्ट करुन मिशी आणि दाढीच्या पांढऱ्या केसांवर लावल्यास पांढरे केस नाहीसे होतात. मूगात असलेल्या एक्सफोलिएटिंग गुणांमुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस मुळापासून काढता येतात. तसेच गुलाबजल त्वचा स्वच्छ करण्यासोबतच केसांना दूर करण्यासाठी मदत करतं.