बंद करायचीये ओठांवरील काळे डाग लपवण्याची कटकट, हे सोपे उपाय वापरा पटपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:53 AM2019-04-26T10:53:55+5:302019-04-26T10:56:32+5:30
अनेकदा पुरेशी काळजी न घेतल्याने ओठांवर काळे डाग येतात. हे डाग येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
(Image Credit : Croda Personal Care)
अनेकदा पुरेशी काळजी न घेतल्याने ओठांवर काळे डाग येतात. हे डाग येण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की, अधिक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करणे किंवा आरोग्याशी संबंधित काही समस्य असणे. लोक हे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात आणि यात ते अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा देखील वापर करतात. अशात काही घरगुती उपाय असतात जे ना ओठांचे डाग दूर तर करतीलच पण याच्याने ओठांचं काही नुकसानही होणार नाही.
१) बदाम तेल - बदाम तेल ओठांवर बोटांच्या मदतीने लावे रब करा आणि रात्रभर तसंच ठेवा. ही प्रक्रिया रोज रात्री करा. बदाम तेलात ब्लीचिंग एजंट असतात ज्याने ओठ हायड्रेट राहतात आणि काळे डाग दूर होतात.
२) लिंबू आणि मध - १-२ थेंब लिंबाच्या रसात १ ते २ थेंब मध मिश्रित करा आणि ओठांवर लावा. हे ओठांवर १० मिनिटे तसंच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. लिंबू आणि मधात अॅंटीसेप्टिक गुण असतात आणि ब्लीचिंग एजंट असतात ज्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो आणि काळे डागही सहजपणे दूर होतात.
३) शुगर स्क्रब - एक चमचा साखरेत काही थेंब लिंबाचा रस टाका आणि याने ३ ते ४ मिनिटे ओठांवर स्क्रब करा. चांगला परिणाम बघण्यासाठी आठवड्यातू २ ते ३ वेळा ही प्रक्रिया करा. स्क्रबिंग तुमच्या ओठांना एक्सफोलिएट करतं ज्यामुळे डेड स्कीन आणि काळे डाग दूर होतात. याने नवीन सेल्सचा विकासही होतो.
(Image Credit : makeupandbeauty.com)
४) काकडीचा ज्यूस - काकडीचा रस ओठांवर लावून १० ते १५ मिनिटांसाठी तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी ही प्रक्रिया दिवसातून २ वेळा करा. काकडीमध्ये ब्लीचिंग आणि हायड्रेटिंग गुण असतात जे काळे डाग दूर करतात. याने ओठ मॉइश्चराइज करण्यासही मदत मिळते.