तुमचे केस कुरळे आहेत का? 'या' घरगूती उपायांनी घ्या केसांची काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:22 AM2018-07-31T11:22:19+5:302018-07-31T11:25:01+5:30
बदलत्या फॅशन ट्रेंन्डसोबतच सध्या हेअर स्टाइल्सचे ट्रेन्डही बदलताना दिसतात. कधी सरळ केस तर कधी कुरळे केस आपल्याला केसांच्या अनेक स्टाइल करता येतात. त्यातील कुरळे केस पहायला सुंदर दिसतात पण त्यांची काळजी घेणं तितकचं अवघड असतं.
बदलत्या फॅशन ट्रेंन्डसोबतच सध्या हेअर स्टाइल्सचे ट्रेन्डही बदलताना दिसतात. कधी सरळ केस तर कधी कुरळे केस आपल्याला केसांच्या अनेक स्टाइल करता येतात. त्यातील कुरळे केस पहायला सुंदर दिसतात पण त्यांची काळजी घेणं तितकचं अवघड असतं. कुरळ्या केसांचा लगेच गुंता होतो आणि तो गुंता लगेच सुटतही नाही. त्यामुळे केस विंचरताना तुटतात. कुरळे केसांचे स्टायलिंग करणं हे देखील अवघड काम असतं. पण त्यासाठी फारशी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपायांना कुरळ्या केसांची काळजी घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या केसांची निगा राखणं आणि स्टायलिंग करणंही सोप्प होतं.
1. जास्वंदाचं फूल
जास्वंदाची 2-3 फूल घेवून त्यांना पाण्यासोबत वाटून घ्या. आणि त्यांची पेस्ट केसांवर लावा. त्यानंतर 10 मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. पण त्यानंतर केसांना शम्पू लावू नका. तुम्ही जास्वंदाच्या फुलाच्या पेस्टसोबत त्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबूही टाकू शकता.
2. कोरफड
कुरळ्या केसांची काळजी घेण्याचा आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी कोरफड एक रामबाण उपाय आहे. कोरफडीचा ताजा गर घेऊन त्याने तुमच्या केसांच्या मुळाना मसाज करा. त्यानंतर 15 मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका आणि शॅम्पूने केस धुवून घ्या. असे आठवड्यातून 2 वेळा केल्यानं केस मुलायम होतील.
3. बेकिंग सोडा
अर्धा कप बेकिंग सोडा कोमट पाण्यात घालून त्यांची पेस्ट केसांना लावून 5 मिनिटांपर्यंत मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.
4. ऑईल मसाज
केसांना तेलानं मसाज केल्यानं केसांचा ड्रायनेसपासून बचाव होतो. तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा आणि एक टॉवेल गरम पाण्यात बुडवून नीट पिळून घ्या. त्यानंतर तो टॉवेल केसांना गुंडाळा. त्यानंतर एक तासाने शॅम्पूने नीट केस धुवून घ्या.
5. मध
एका वाटीमध्ये मध आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांच्या मुळापाशी मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
6. मेथीचे दाणे
मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्यांची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये 3 चमचे दही, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका.