महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही, 'या' घरगुती उपायांनी लगेच दूर होतील चेहऱ्यावरील डाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:24 PM2024-10-22T15:24:23+5:302024-10-22T15:25:30+5:30
Pigmentation : हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी महागडी उत्पादने खरेदी करतात. पण यांचा काही फायदा होत नाही. अशात काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
Pigmentation : बदलती लाइफस्टाईल आणि प्रदूषण याचा प्रभाव महिला असो वा पुरूष कुणाच्याही चेहऱ्यावर बघायला मिळतो. चेहऱ्यावर छोटे छोटे डाग दिसू लागतात. ज्यामुळे चेहऱ्याचा लूकचं बिघडतो. हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी महागडी उत्पादने खरेदी करतात. पण यांचा काही फायदा होत नाही. अशात काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचे उपाय
- जर चेहऱ्यावर दिसणाऱ्या डागांमुळे तुम्ही हैराण असाल तर तुम्ही बटाटा आणि लिंबाचा वापर करू शकता. 1 मोठा आलू किसून घ्या आणि त्याचा रसा काढा. नंतर त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मालिश करा आणि 20 मिनिटे तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. लिंबामध्ये ब्लीचिंग गुण असतात, ज्यामुळे डाग कमी होतात. हा उपाय काही दिवस केल्यावर फरक दिसेल.
- चेहऱ्यावर डाग दूर करण्यासाठी तुम्ही कांद्याचाही वापर करू शकता. यासाठी एक कांदा एक ग्लास गरम पाण्यात 30 मिनिटांसाठी ठेवा. हे पाणी चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसंच ठेवा. या पाण्याचा वापर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करावा.
- डाग दूर करण्यासाठी 2 चमचे बेसनात चिमुटभर हळद टाका आणि यात थोडं दुधही टाका. याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरील डागांवर लावा आणि नंतर सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या.
- चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचाही वापर करू शकता. यासाठी थोडे तांदूळ एक वाटी पाण्यात भिजवून ठेवा. 30 मिनिटांनी यातील पाणी गाळून घ्या. तांदळाचं हे पाणी टोनरसारखं चेहऱ्यावर लावा. या उपायाचा फरक तुम्हाला 15 दिवसात दिसून येईल.