हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:38 PM2024-11-05T14:38:15+5:302024-11-05T14:46:53+5:30

lip care tips in winter : या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

Home remedies to take care of lips in winter | हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

lip care tips in winter : हिवाळ्यात थंडीमुळे जास्तीत जास्त लोकांना ओठ उलण्याची किंवा कोरडे होण्याची समस्या होत असते. अशात अनेकदा ओठांवर भेगा पडतात आणि मासही निघतं. हिवाळ्यात कमी पाणी पिणे, हेल्दी पदार्थ न खाणे आणि जुने प्रॉडक्ट वापरणे ही कारणे सांगता येतील. अशात या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

ओठांची काळजी घेण्यासाठी काय कराल?

- महिला ओठांवर नेहमीच लिपस्टिक लावतात. हे लिपस्टिक जोर लावून किंवा घासून काढण्याचा प्रयत्न करू नका. याने ओठांची त्वचा घासली जाते. तसेच नेहमी असं केल्याने ओठांचा आकारही बिघडू शकतो.
- जेव्हा तुम्ही चहा पिता किंवा कोणतंही गरम द्रव्य पिता तेव्हा काळजी घ्या की, फार गरम काही सेवन करू नये. कारण ओठ जेव्हा गरम ग्लास किंवा कपाच्या संपर्कात येतात, त्याने ओठाची त्वचा काळवंडते. याने नंतर ओठांचा मुलायमपणाही कमी होतो. 
- हिवाळ्यात हलके पदार्थ भरपूर खावेत आणि पाणीही भरपूर प्यावे. याने ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो आणि ओठांची काळजीही योग्य पद्धतीने घेतली जाते. ओठांची त्वचा ड्राय होणार नाही. 
- रात्री झोपताना ओठांवर खोबऱ्याचं तेल लावावं. जर खोबऱ्याचं तेल लावायचं नसेल तर  तुम्ही चांगल्या क्वालिटीचं पेट्रोलियम जेली सुद्धा वापरू शकता. जेली लावल्यावर हळुवारपणे तुम्ही ओठांची मसाजही करू शकता.
- जर ओठ फाटत असतील तर मुलायम करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांवर मध लावावे. सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे. ओठ मुलायम होतील.
- हेल्दी पदार्थांचं सेवनही यासाठी महत्वाचं ठरतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं मिळतात. अनेकदा शरीरात आयर्नची कमतरता असेल तर ओठ काळे पडतात. त्यामुळे हेल्दी पदार्थांचं सेवन करणं महत्वाचं ठरतं.
- ओठ तेव्हाच चांगले राहतील जेव्हा ओठांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. यासाठी नियमितपणे ओठांची हलक्या हाताने मसाज करावी.
- ओठांवरील लिपस्टिक क्लिजिंग मिल्कने काढा. कॉटनवर क्लिजिंग मिल्क लावून ओठ साफ करा. तसेच मलाईमध्ये लिंबू मिश्रित करूनही तुम्ही ओठांची मालिश करू शकता.
 

Web Title: Home remedies to take care of lips in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.