व्हाइटहेड्सने त्रस्त आहात? 'या' उपायांनी करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:23 PM2018-12-14T17:23:43+5:302018-12-14T17:24:21+5:30

त्वचेच्या अनेक समस्यांपैकी सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना प्रकर्षाने उद्भवणारी एक समस्या म्हणजे ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स. त्वचेवर असणारे बॅक्टेरियाच पिंपल्स आणि व्हाइटहेड्सचं प्रमुख कारण ठरतात.

Home remedies for whiteheads | व्हाइटहेड्सने त्रस्त आहात? 'या' उपायांनी करा दूर

व्हाइटहेड्सने त्रस्त आहात? 'या' उपायांनी करा दूर

googlenewsNext

त्वचेच्या अनेक समस्यांपैकी सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना प्रकर्षाने उद्भवणारी एक समस्या म्हणजे ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स. त्वचेवर असणारे बॅक्टेरियाच पिंपल्स आणि व्हाइटहेड्सचं प्रमुख कारण ठरतात. यापासून बचाव करण्यासाठी त्वचा नेहमी स्वच्छ ठेवण्याची गरज असते. त्वचेतून जास्त प्रमाणात तेल उत्सर्जित झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अशातच ऑयली स्किन असणाऱ्या लोकांना आपल्या स्किनवर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी व्हाइट हेड्स किंवा पिंपल्स येण्याची शक्यता अधिक असते. बाजारामध्ये असे अनेक प्रोडक्ट्स असतात जे या समस्यांपासून सुटका करण्यासाठी उपयोगी ठरतात. परंतु या प्रोडक्ट्सचे अनेक साइड इफेक्ट्सही असतात. अशावेळी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरगुती प्रोडक्ट्सचा वापर करणं फायदेशीर ठरतं. 

फेशियल स्टिम

व्हाइटहेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी फेशियल स्टिम उत्तम उपाय आहे. यासाठी थोडं पाणी उकळून एका पसरट बाउलमध्ये ठेवा. आता व्हाइटहेड्स असलेल्या त्वचेवर स्टिम घ्या. जर व्हाइटहेड्स गळा किंवा डोक्यावर असतील तर एक टॉवेल गरम करून व्हाइटहेड्स असलेल्या ठिकाणी वाफ द्या. 

लिंबाचा रस 

त्वचा जास्त ऑयली असेल तर व्हाइट हेड्स जास्त होतात. यापासून सुटका करण्यासाठी लिंबाचा रस फार फायदेशीर ठरतो. यामध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल कंपाउंड्स असतात. हे व्हाइटहेड्स असणाऱ्या त्वचेवर लावल्याने ही समस्या दूर होते. त्यासाठी कॉटन बॉल लिंबाच्या रसामध्ये भिजवून पिंपल्सवर लावल्याने फायदा होईल. 

मध 

मध एक पॉवरफुल अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्मांपैकी एक आहे. व्हाइटहेड्सपासून सुटका करण्यासाठी मध हलकं गरम करून स्किन व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. मध थोडं कोमट करून व्हाइट हेड्सवर 15 मिनिटांसाठी लावून तसचं ठेवा. 

कडुलिंबाची पानं

व्हाइटहेड्सपासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पानं फायदेशीर ठरतात. त्यासाठी कडुलिंबाची पानं आणि हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवर लावून 15 ते 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. 

ताजी फळं खा आणि भरपूर पाणी प्या

व्हाइटहेड्सची समस्या दूर करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं असतं. त्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. ताज्या फळांचं सेवन करा. यामुळे रक्त शुद्ध राहून स्किनच्या सर्व समस्या दूर होतील. 

Web Title: Home remedies for whiteheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.