पांढरे केस काळे करण्यासाठी डाय लावणं सोडा, फक्त चहा पावडरमध्ये मिश्रित करा 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:59 AM2020-03-16T11:59:03+5:302020-03-16T12:20:11+5:30
चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ कसा कराल हा उपाय...
साधारणपणे सगळेच लोक एकदा चहा केल्यावर त्यातील चहा पावडर फेकून देतात. लोकांना वाटतं की, चहा केल्यावर चहा पावडर खराब होते. पण असं अजिबात नाही. चहा पावडरचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे होत असलेले केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता. काळ्या चहाची पत्ती म्हणजे पावडरमध्ये टॅनिक अॅसिड असतं. जे काही वेळातच पांढऱ्या केसांना काळं करतं. तेच या चहा पावडरमध्ये काही वस्तू चहा पावडरमध्ये मिश्रित करून पांढऱ्या केसांची समस्या दूर केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ कसा कराल हा उपाय...
पहिली पद्धत - हा उपाय करण्यासाठी १ लिटर पाणी, १० चमचे चहा पावडर किंवा टी बॅग लागतील. एका भांड्यात पाणी टाका. ते उकडण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहा पावडर घाला. आता आच मध्यम ठेवा आणि पाणी चांगलं उकडू द्या. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर एका हेअर ब्रशच्या मदतीने हे पाणी केसांसोबत केसांच्या मुळात लावा. हे पाणी आंघोळीच्या ३० मिनिटांआधी लावा. नंतर कोमट पाण्याने केस धुवावे.
दुसरी पद्धत - १ लिटर पाणी, १० चमचे चहा पावडर, ६ चमचे कॉफी घ्या. एका भांड्यात पाणी आणि चहा पावडर टाका. ते चांगलं उकडू द्या आणि नंतर त्यात कॉफी पावडर मिश्रित करा. नंतर पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या. हे पाणी केसांना लावा आणि ३० मिनिटांची केस धुवावे.
किती दिवसात मिळेल रिझल्ट?
केस काळे करण्याची ही पद्धत परमनन्ट नाही. पण मार्केटमध्ये मिळत असलेल्या केमिकलयुक्त डायपेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आहे. केस चमकदार आणि काळे ठेवण्यासाठी आठवड्यातून तीनदा हा उपाय केला तर फायदा होईल.