पुरूषांसाठी काही खास फेस मास्क; जे ऑयली स्किनपासून करतील सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 12:26 PM2018-10-19T12:26:33+5:302018-10-19T12:27:39+5:30
महिलांसोबतच अनेक पुरूषदेखील आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते देखील बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेत असतात.
(Image Creadit : Men Health India)
महिलांसोबतच अनेक पुरूषदेखील आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते देखील बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेत असतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. अनेक पुरूषांची स्किन ऑयली असते. त्यामुळे त्यांनी कितीही उपाय केले तरीदेखील काही फायदा होत नाही. कोणत्याही प्रकारचं क्रिम किंवा लोशनचा त्यांच्या स्किनवर परिणाम होत नाही. मग अनेकदा वैतागून सलूनमध्ये जाऊन अनेक खर्चिक ट्रिटमेंट करण्यात येतात. परंतु त्याचा काही फायदा होत नाही.
तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर त्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जाणून घेऊया काही घरगुती फेस पॅक ज्यांच्या वापर करून तुम्ही ऑयली स्किनची समस्या दूर करू शकता.
1. काकडीचा फेस मास्क
काकडी स्किनवरील डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी आणि स्किनवरील अतिरिक्त ऑईल दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही दही किंवा मधासोबत काकडीचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता. हा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे ऑयली स्किनपासून सुटका होण्यास मदत होईल. हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने फायदा होईल.
2. मधाचा फेस मास्क
तुम्ही मधासोबत दही आणि सफरचंद टाकून एक पेस्ट तयार करा. मधामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे त्वचेवरील घाण साफ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच सफरचंदामधील गुणधर्म चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद करण्यासाठी फायदेशीर ठरतं. सफरचंद आणि मधाची एक पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांपर्यंत ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
3. टॉमेटो मास्क
टॉमेटो एक नैसर्गिक प्रकारचा स्किन टोनर आहे. चेहऱ्यावर टॉमेटोच्या रसाने चेहऱ्यावर मसाज केल्याने स्किनला अनेक फायदे होतात. तुम्ही दूधामध्ये टॉमेटोचा रस मिक्स करून पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. फायदा होईल.
4. कडुलिंब
कडुलिंब चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद करण्यासोबतच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. रात्री गरम पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर ही बारिक करून घ्या. त्यानंतर या पस्टमध्ये थोडं दूध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा. 20 मिनिटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.