डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी 'हा' होममेड मास्क ठरतो फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:12 PM2018-12-24T15:12:32+5:302018-12-24T15:16:02+5:30

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा ही समस्या योग्य आहार किंवा झोप न घेणं आणि शरीराच्या इतर समस्यांपासून उद्भवते. अनेक तरूणी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नवनवीन उपाय ट्राय करत असतात.

Homemade mask remove dark circles | डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी 'हा' होममेड मास्क ठरतो फायदेशीर!

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी 'हा' होममेड मास्क ठरतो फायदेशीर!

Next

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा ही समस्या योग्य आहार किंवा झोप न घेणं आणि शरीराच्या इतर समस्यांपासून उद्भवते. अनेक तरूणी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नवनवीन उपाय ट्राय करत असतात. परंतु त्याचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्हीही या समस्येने हैराण असाल तर आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. या होममेड मास्कचा वापर करून तुम्ही डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल्स दूर करू शकता. 

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का होतात?

झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांना डार्क सर्कल्सचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त तणाव, प्रदूषण, वाढतं वय, कंम्प्युटर किंवा मोबाईलचा जास्त वापर, योग्य आहार न घेणं, आयर्नची कमतरता आणि हार्मोन्सचं असंतुलन ही डार्क सर्कल्स होण्याची मुख्य कारणं आहेत. याव्यतिरिक्त कडक उन्हामध्ये जास्त वेळ घालवल्याने स्किनवर डार्क स्पॉट पडतात आणि त्यामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येतात. 

बटाटा-बदामाच्या पेस्टचा उपयोग करून दूर करा डार्क सर्कल्स :

साहित्य :

  • बदाम 4 ते 5
  • बटाट्याचा रस अर्धा चमचा
  • चिमुटभर चंदनाची पावडर 

 

पेस्ट तयार करण्याची कृती :

बटाटा आणि बदामाची पेस्ट डाग आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरते. ही पेस्ट तयार करण्यासाठी रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी बदाम वाटून त्यामध्ये अर्धा चमचा बटाट्याचा रस आणि चिमुटभर चंदनाची पावडर एकत्र करा. 

असा करा वापर :

तयार मास्क लावण्याआधी फेसवॉशने चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर हा मास्क डोळ्यांखाली लावून अर्ध्या तासासाठी तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत स्वच्छ पाण्याने मास्क स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉयश्चरायझर किंवा क्रिम अप्लाय करा. काही दिवस असं केल्याने डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होते. 

बटाटा-बदामाच्या पेस्टचे इतर फायदे :

बटाटा आणि बदामाची पेस्ट चेहऱ्यावर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही मदत करते. याव्यतिरिक्त हा मास्क लावल्याने डेड स्किन निघून जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. 

Web Title: Homemade mask remove dark circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.