केस गळणं आणि तुटण्याने हैराण झाला आहात? 'या' तेलाचा वापर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 11:00 AM2018-10-17T11:00:13+5:302018-10-17T11:02:12+5:30
बदलत्या वातावरणात केस तुटणं आणि गळणं ही एक कॉमन समस्या आहे. फक्त महिलाच नाही तर अनेक पुरूषही या समस्येने त्रस्त असतात.
बदलत्या वातावरणात केस तुटणं आणि गळणं ही एक कॉमन समस्या आहे. फक्त महिलाच नाही तर अनेक पुरूषही या समस्येने त्रस्त असतात. यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही महागडा शॅम्पू, तेल किंवा डॉक्टरांकडून ट्रिटमेंट घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या सर्व उत्पादनांमध्ये अनेक केमिकल्स आढळून येतात. परंतु त्याऐवजी घरच्या घरी काही घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या सोडवू शकता.
घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये एक खास तेल तयार करा. एका आठवड्यात 2 ते 3 वेळा वापरल्यानंतर तुटणाऱ्या आणि गळणाऱ्या केसांपासून सुटका करून घेऊ शकता. तसेच या तेलाने केस मुलायम आणि दाट होण्यासही मदत होते.
तेल तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य :
- अर्धा लीटर मोहरीचं तेल
- अर्धा कप मेथीचे दाणे
तेल तयार करण्याची कृती :
सर्वात आधी एका पॅनमध्ये अर्धा लीटर मोहरीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. 2 ते 3 मिनिटांनंतर त्यामध्ये अर्धा कप मेथीचे दाणे टाका. गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेव्हा मेथीचे दाणे हलक्या ब्राउन रंगाचे होतील त्यावेळी गॅस बंद करा.
गॅस बंद करा आणि जवळपास अर्धा तास तेल थंड करत ठेवा. एका गाळणीने तेल गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीमध्ये ठेवा.
तयार तेल केसांना लावा :
रात्री झोपताना हे तेल डोक्याच्या त्वचेला आणि केसांना लावा. केसांच्या मुळांजवळ या तेलाने मसाज करा. यामुळे डोक्याच्या त्वचेचा रखरखीतपणा कमी होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यावर केस धुवून टाका. असं आठवड्यातून 3 वेळा करा. काही दिवसांतच केसांमध्ये बदल जाणवेल. त्याचप्रमाणे केसांचं गळणं कमी होऊन केसांना एक नवीन चमक येईल.
टिप : प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.