उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण करण्यासाठी होममेड पील ऑफ मास्क करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:47 PM2019-04-03T13:47:34+5:302019-04-03T13:53:18+5:30
घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात.
(Image Credit : superdicasartvitta.com.br)
घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात. या डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण अनेकदा यांमुळे त्वचेचा उजाळा नाहीसा होतो. अशावेळी निस्तेज त्वचेपासून सुटका करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी पील ऑफ मास्क फायदेशीर ठरत. आता तुमही म्हणाल की, बाजारात मिळणाऱ्या पील ऑफ मास्कमध्ये अनेक केमिकल्स असतात. अशावेळी तुम्ही घरीदेखील पील ऑफ मास्क तयार करून तुमच्या चेहऱ्याचा हरवलेला ग्लो पुन्हा मिळवू शकता.
पील ऑफ मास्कचे फायदे :
1. होममेड पील ऑफ मास्कचा वापर केल्याने स्किनवर जमा झालेली घाण, बॅक्टेरिया आणि खराब सेल्सला काढून टाकण्यासाठी मदत करतो. याचबरोबर चहऱ्यावर ग्लो येतो. एका आठवड्यामध्ये जर तुम्ही दोन वेळा मास्कचा वापर केला तर तुम्ही आणखी सुंदर दिसू शकता.
2. चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी पील ऑफ मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. मास्कचा वापर केल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि स्किनवर नवीन लेयर येते. तसचे चेहऱ्याची त्वचा तजेलदार दिसू लागते.
3. पील ऑफ मास्कचा वापर केल्याने स्किन सॉफ्ट आणि टाइट होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हा मास्क ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.
4. पील ऑफ मास्कमध्ये फळांचा वापर करण्यात येतो. फळांमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नसतात.
घरीच तयार करा पील ऑफ मास्क
एग व्हाइट फेस मास्क
हा मास्क चेहऱ्यावरील काळे डाग स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. हे तयार करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि यामध्ये पीठी साखर एकत्र करा. यानंतर हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यावर टिशू पेपर लावा. आता टिशू पेपरवर पुन्हा ते मिश्रण लावा. हे सुकल्यानतर टिशू पेपर काढून टाका. ज्यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत होइल तसेच डेड स्किन सेल्स निघून जातील.
(Image Credit : Eat This, Not That!)
ग्रीन टी आणि लेमन फेस मास्क
हा मास्क तयार करण्यासाठी ग्रीन टी पाण्यामध्ये एकत्र करा आणि त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर यामध्ये थोडी जिलेटीन पावडर एकत्र करा. त्यानंतर काही वेळासाठी ओव्हनमध्ये ठेवा आणि व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावून घ्या. काही वेळासाठी तसचं ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर ते काढून टाका.
ऑरेंज पील फेस मास्क
ऑरेंज पील फेस मास्क तयार करण्यासाठी संत्र्याच्या साली उन्हामध्ये कमीत कमी दोन दिवस सुकवून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर गॅसवर मंद आचेवर एक कप पाणी उकळून त्यामध्य साखर एकत्र करा. पाणी आटल्यानंतर त्यामध्ये संत्र्याच्या सालींची पावडर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे सुकल्यानंतर काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.