ओठाचं आणि गालांचं सौंदर्य वाढवायचंय? ट्राय करा हे होममेड टिंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:06 PM2019-04-12T12:06:38+5:302019-04-12T12:13:20+5:30

सुंदर दिसण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणत्याही महिलेच्या सुंदरतेत त्यांचे ओठ आणि गाल अधिक महत्त्वाची ठरतात.

This homemade tint to beautiful lip and cheek | ओठाचं आणि गालांचं सौंदर्य वाढवायचंय? ट्राय करा हे होममेड टिंट!

ओठाचं आणि गालांचं सौंदर्य वाढवायचंय? ट्राय करा हे होममेड टिंट!

Next

सुंदर दिसण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणत्याही महिलेच्या सुंदरतेत त्यांचे ओठ आणि गाल अधिक महत्त्वाची ठरतात. त्यामुळेच महिला ओठ आणि गालाची सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारातील केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतात.

मात्र हे प्रॉडक्ट वापरुन काहीवेळेपुरती सुंदरता तर मिळेल पण त्वचेला नुकसानही होईल. त्यामुळे यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करायला हवा. याचे काही साइड इफेक्टही नाहीत. असाच एका उपाय म्हणजे बीट. बीटाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ओठांवर आणि गालावर एक वेगळी लूक आणण्यासाठी बीट फायद्यांचं ठरतं. 

कसं कराल तयार?

१) बीटाचे तुकडे करुन वाळवा.

२) सुकलेल्या बीटाचं पावडर तयार करा. 

३) दोन चमचे बीटाच्या पावडरमध्ये दोन चमचे बदामाचं तेल टाकून टिंट(रंग) तयार करा.

४) हे स्वच्छ नेल पेंटच्या बॉटलमध्ये साठवून ठेवा.

५) हे टिंट ओठांवर आणि गालांवर बोटांच्या मदतीने लावा.

(Image Credit : bhrcenter.com)

बीटाचे आणखीही फायदे

बीटाच्या टिंटसोबतच याचा तुम्ही फेसपॅकही तयार करु शकता. बीटापासून तयार फेसपॅकने चेहऱ्यावर गुलाबी रंगत येते. तसेच बीटामध्ये असलेल्या अ‍ॅंटीऑक्सिडेंट्समुळे त्वचेची एजिंग समस्याही दूर होते. त्यासोबतच बीटाच्या रस डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठीही वापरु शकता. बीटाचा रस चेहऱ्यावर लावल्याने ग्लो सुद्धा येतो. 

Web Title: This homemade tint to beautiful lip and cheek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.