ओठांच्या ड्रायनेसमुळे मेकअपचा होतोय का सत्यानाश? या घरगुती टिप्स येतील कामात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:35 PM2019-04-30T13:35:28+5:302019-04-30T13:36:12+5:30
चेहऱ्याची सुंदरता आणि रंगत वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करतो.
चेहऱ्याची सुंदरता आणि रंगत वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करतो. पण अनेकजण हे विसरून जातात की, ओठही त्यांच्या चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. विचार करा की, जर तुम्ही फारच आकर्षक मेकअप केलाय, पण तुमचे ओठ ड्राय आहेत तर ते कसं दिसेल. तुमची ही ड्राय ओठांची समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती टिप्स देणार आहोत.
गुलाबजल
मिल्क क्रिम, लिंबाचा रस आणि मध यातील काहीही ओठांवर लावल्यावर गुलाबजलने ओठ स्वच्छ करणे कधीही चांगले. याने ओठांचा रंग कायम राहतो. सोबतच ओठ मुलायम देखील होतात.
मिल्क क्रिम
किचनमध्ये असलेल्या क्रिमचा वापर फार पूर्वीपासून ओठांना मुलायम आणि सुंदर करण्यासाठी केला जातो. मिल्क क्रिममध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि मध मिश्रित करून ओठांवर लावा. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला फायदा बघायला मिळेल. याने ओठांचा काळपटपणा दूर होतो आणि आधीपेक्षा अधिक मुलायम होतात. सोबतच याने ओठांवरील डेड स्कीनही दूर होते.
तेल
ऑलिव्ह ऑइल, कोकनट ऑइल, बदाम, मोहरीचं तेल यांचा वापर करून ओठ मुलायम आणि सुंदर करता येऊ शकतात. तसेच या तेलांमुळे ऑइल अॅलर्जी आणि यूवी रेडिएशनपासूनही बचाव होतो. ज्याने ओठांचा काळेपणा दूर होतो.
ब्रॅन्डेड लिपस्टिक
लिपस्टिकची निवड करताना जास्तीत जास्त महिलांचा फोकस लिपस्टिच्या कलरवर असतो. त्यातील तत्वांवर नाही. ज्यामुळे अनेकदा ओठ रखरखीत, ड्राय आणि डार्क होतात. त्यामुळे लिपस्टिक खरेदी करताना ते चांगले सामान्य असू नये.
लिंबाचा रस
ड्राय लिप्ससाठी लिबांचा रस फार फायदेशीर मानला जातो. लिंबाच्या रसात मधाचे काही थेंब मिश्रित करून ओठांवर लावा. याने केवळ ओठांचा डार्कनेस दूर होईल असे नाही तर ओठ मुलायम देखील होतील.
स्क्रब आणि मसाज
बर्फाने ओठांची मसाज करा. त्यासोबतच मिल्क क्रिम आणि गुलाबजलच्या पाकळ्यांनी मसाज करणे फायदेशीर आहे.