इन्फेक्शन असो वा पिंपल्स; त्वचेच्या समस्यांसोबतच आरोग्यही राखतं 'गरम पाणी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:12 AM2019-09-19T11:12:52+5:302019-09-19T11:13:08+5:30
आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत आपण ऐकलं आहेच. गरम पाणी ब्लड प्रेशर नॉर्म ठेवण्यासोबतच पचनक्रिया आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? गरम पाण्यामध्ये चेहऱ्याच्या सौंदर्याचं गुपित दडलेलं आहे.
आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत आपण ऐकलं आहेच. गरम पाणी ब्लड प्रेशर नॉर्म ठेवण्यासोबतच पचनक्रिया आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? गरम पाण्यामध्ये चेहऱ्याच्या सौंदर्याचं गुपित दडलेलं आहे. जाणून घेऊया गरम पाणी आरोग्यासाठी कसं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
1. गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. ज्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर निघून जातात. याव्यतिरिक्त हे कोलेजन प्रोडक्शनसाठीही मदत करतं. त्यामुळे त्वचा हेल्दी राहते आणि स्किन इन्फेक्शन दूर होतं.
2. गरम पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी तत्व बाहेर निघून जातात. त्यामुळे त्वचेचं तारूण्य टिकवण्यासोबतच त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. त्याचबरोबर स्किनमध्ये असलेले फ्री रॅडिकल्स निघून जातात.
3. गरम पाणी प्यायल्याने शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत होतो. याचा परिणाम असा होतो की, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे दाग नसतात आणि चेहऱ्याची त् वचाही मुलायम होते.
4. पोटाच्या समस्यांचा सामना करत असाल तर त्यावर उपाय म्हणून गरम पाणी फायदेशीर ठरतं. पण लक्षात ठेवा की, पाणी हळूहळू प्या. गरम पाणी एकदम प्यायल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. तसेच दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्याही दूर होतील.
5. गरम पाणी पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते आणि जर पचनक्रिया सुरळीत असेल तर वजन कमी करणंही अत्यंत सोपं होतं. अनेकदा आपण अशा अन्नपदार्थांचं सेवन करतो. जे पोट सहज पचवू शकत नाही. अशावेळी गरम पाणी मदत करतं. यामुळे पोट स्वच्छ राहतं आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)