नारळ पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग 'असे' करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:35 PM2019-02-05T13:35:51+5:302019-02-05T13:41:20+5:30
चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग दिसतात. पिंपल्सचे डाग ही अजिबातच सामान्य बाब नाही.
चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग दिसतात. पिंपल्सचे डाग ही अजिबातच सामान्य बाब नाही. मग हे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे बाजारातील प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण त्यानेही हवा तसा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. नारळाचं पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे तुम्हाला माहीत आहेच. सोबतच नारळाच्या पाण्याचे त्वचेसाठीही अनेक फायदे होतात. नारळाच्या पाण्याने चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग आणि काजण्यांचे डाग दूर करण्यास फायदेशीर ठरू शकतं. काजण्यांचे डाग बऱ्याच प्रमाणात हलके होतात.
कसा होतो फायदा?
- नारळाच्या पाण्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचा उजळते आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासही याने मदत होते.
- नारळाच्या पाण्याचं सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं, ज्यामुळे त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतं.
- नारळाच्या पाण्यामध्ये सायटोकिनीन तत्त्व असतात. याने त्वचा निरोगी राहते आणि त्वचेच्या पेशींमध्ये सुधारणा होते.
- नारळाच्या पाण्यामध्ये अॅंटीमायक्रोबायल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी फंगल तत्त्व असतात, ज्याने त्वचेला इन्फेक्शन होत नाही.
- तसेच नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यांनी त्वचेवरील मृत पेशी दूर केल्या जातात.
(Image Credit : DAILY HEALTH DIRECTORY)
कसं वापराल ?
- कॉटनच्या मदतीने नारळाचं पाणी त्वचेवरील पिंपल्सच्या जागांवर लावा.
- हे रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
- हा उपाय काही दिवस सतत करा, त्यानंतर याचा फायदा बघायला मिळेल.
(Image Credit : Skincare by Alana)
नारळाच्या पाण्याचा फेस पॅक
नारळाच्या पाण्याचा फेसपॅक तुम्ही एक दिवसआड लावू शकता. यानेही चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते.
१) २ चमचे नारळाचं पाणी आणि १ चमचा काकडीचा ज्यूस एकत्र करा.
२) यात एक चमचा दूध टाकून चांगल्याप्रकारे मिश्रण तयार करा.
३) हा पेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसंच राहू द्या.
४) हा उपाय रोज केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल.