नेहमी तरुण दिसण्यासाठी मदत करतात कोलेजन आणि इलास्टिन, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 12:43 PM2019-01-16T12:43:31+5:302019-01-16T12:45:36+5:30

वाढत्या वयाचा प्रभाव सर्वातआधी आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. त्यामुळे हे दिसून येणारं वाढतं वय प्रत्येकालाच कमी करायचं असतं.

How collagen and Elastin work for Youngness | नेहमी तरुण दिसण्यासाठी मदत करतात कोलेजन आणि इलास्टिन, जाणून घ्या कसे?

नेहमी तरुण दिसण्यासाठी मदत करतात कोलेजन आणि इलास्टिन, जाणून घ्या कसे?

googlenewsNext

वाढत्या वयाचा प्रभाव सर्वातआधी आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. त्यामुळे हे दिसून येणारं वाढतं वय प्रत्येकालाच कमी करायचं असतं. पण त्यासाठी आवश्यक अशा दोन मुख्य पोषक तत्त्वांचा वापर लोक फारच कमी करतात. हे पोषक तत्त्व आपलं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. ते पोषक तत्त्व आहेत कोलेजन आणि इलास्टिन. हे दोन्ही पोषक तत्व एकप्रकारे प्रोटीन असतात. पण लोक याचा वापर फारच कमी करतात. त्यामुळे ते कमी वयातही वयोवृद्ध दिसू लागतात.  

आपल्या त्वचेला कोलेजन आणि इलास्टिनमुळे शक्ती आणि लवचीकपणा मिळतो. हेच ते दोन महत्वपूर्ण प्रोटीन आहेत जे त्वचेला आकार देण्यासाठी आणि बनावट कायम ठेवण्यासाठी काम करतात. त्यामुळे कोलेजन आणि इलास्टिन असलेले पदार्थ खाऊन तुम्ही वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी लक्षणे कमी करु शकता. 

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी ८ प्रकारच्या व्हिटॅमिन्सचा एक गट आहे. ज्यात थायामिन (thiamine), रायबोफ्लॅविना (riboflavin), नियासीन (niacin), पॅटोटेनीक अ‍ॅसिड (pantothenic acid), व्हिटॅमिन बी6 (vitamin b6), बायोटिन (biotin), फोलिक अ‍ॅसिड (folic acid) आणि विटामिन बी १२ (vitamin B12) हे व्हिटॅमिन एकत्र असतात. सोबतच याने मानवाच्या शरीरात कोलेजन निर्मितीचंही काम केलं जातं. 

व्हिटॅमिन डी मुळे डिप्रेशन होतं दूर

वेगवेगळ्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन बी६ कमी असतात, त्यांची त्वचा फार कमी कोलेजन निर्माण करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी चा समावेश करु शकता. बीन्स, मटर, राजना, धान्य, हिरव्या भाज्या यांमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. 

तांबे किंवा कॉपर

निरोगी आणि तरुण त्वचेसाठी तुमच्या शरीरात एलिस्टिन आणि कोलेजन हे दोन्ही तत्व एकत्र जोडून ठेवणे गरजेचे आहे. हेच काम तांबे या खनिजाच्या मदतीने केलं जातं. शरीरात एंजाइम लायसील ऑक्सिडीजची हालचाल वाढवण्यासाठी तांब्याची गरज असते. जे कोलेजन आणि इलास्टिन यांना एकत्र जोडण्यास मदत करतं. ऑर्गन मीट, शेलफिश, काजू, बदाम, सूर्यफूलाच्या बीया आणि डाळींमध्ये हे खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. 

व्हिटॅमिन सी

संत्री, लिंबू, आवळा किंवा इतरही आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. कोलेजनसाठी हे व्हिटॅमिन सी युक्त फळे फार उपयुक्त ठरतात. याने कोलेजन जीन उत्तेजित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. याने त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. 

फायटोस्ट्रोजन

एस्ट्रोजेन तत्व महिलेचे मित्र असतात. कारण याने वाढलेलं वय कमी दिसण्यास मदत होते. एस्ट्रोजन आपल्या त्वचेत कोलेजन आणि इलास्टिनचं प्रमाण वाढवतात. शरीरात एस्ट्रोजेनची कमतरता झाल्यास त्वचा निर्जीव, कोरडी आणि सुरकुत्या असलेली होते. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी फायटोस्ट्रोजन युक्त आहार घेणे महत्त्वपूर्ण ठरतं. 

Web Title: How collagen and Elastin work for Youngness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.