बिकीनी वॅक्स करताना ही काळजी घ्या, नाहीतर पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 01:45 PM2019-12-13T13:45:04+5:302019-12-13T16:01:46+5:30
अनेकदा महिला आपल्या प्रायवेट पार्टसवरचे केस काढण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर करतात.
(Image credit- Wikihow)
अनेकदा महिला आपल्या प्रायवेट पार्टसवरचे केस काढण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर करतात. तसंच सर्वाधीक महिला या केस काढण्यासाठी रेजरचा वापर करतात. निकृष्ट दर्जाचे रेजर वापरल्यास त्वचेचं फार नुकसान होऊ शकतं.वर्जायनल इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्याजागी एखादी जखम होणेदेखील खूप त्रासदायक ठरू शकते. याला पर्याय म्हणून काहीजण बिकनी वॅक्स करण्याचा विचार करतात. पण बिकनी वॅक्स करायला जात असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
बिकनी वॅक्स करत असताना शक्यतो योग्य पार्लरची निवड करा. घरच्या घरी बिकनी वॅक्स करणं टाळा. कारण नकळतपणे वॅक्स करताना काही चुका झाल्या तर त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. वॅक्स करताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा. केस काढून झाल्यानंतर मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
तुम्ही पहिल्यांदा बिकनी वॅक्स करत असाल तर नक्कीच वेदना होतील. ज्याप्रमाणे हातांवरचे आणि पायांवरचे केस काढताना वेदना होतात. त्यातप्रमाणे थोड्याफार प्रमाणात प्रायव्हेट पार्टसचे केस काढताना वेदना होतात. अनेक ब्युटी पार्लरमध्ये बिकनी एरियामधील केस काढण्यासाठी खास पॅकेज असतात. ‘ब्राझिलियिन वॅक्स’ने त्या भागाजवळील केस काढले जातात. वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात.
प्रायव्हेट पार्टसची त्वचा जास्त संवेदनशील असते. त्यामुळे या भागाचे वॅक्सिंग करताना ३-४ छोटे छोटे भाग करून वॅक्सचा सालीएवढा जाड थर द्यावा. ७ -८ सेकंदानंतर तो थर खेचून काढावा. त्या जागी लगोलग अँटीसेप्टीक क्रिम लावण्याची खबरदारी घ्यावी. वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.