7 दिवसात नॅच्युरल ग्लो मिळवण्यासाठी या गोष्टी करा फॉलो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 03:56 PM2018-05-01T15:56:19+5:302018-05-01T15:56:19+5:30
जर तुम्हाला लॉंगटर्म ग्लो हवा असेल तर पुढील 7 दिवसाचे रुटीन फॉलो करा. या रुटीनमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील. त्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो मिळेल.
इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही महागडी क्रीम वापरता, महागडी ट्रीटमेंट घेता, महागड्या मेकअपचा वापर करता. पण अशाप्रकारे आलेला ग्लो फार दिवस टिकत नाही. जर तुम्हाला लॉंगटर्म ग्लो हवा असेल तर पुढील 7 दिवसाचे रुटीन फॉलो करा. या रुटीनमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील. त्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो मिळेल.
पहिला दिवस
पहिल्या दिवशी तुम्ही चेहऱ्यावरील घाण साफ करा. क्लीन्जरने चेहरा साफ करा, मॉईस्चरायजरचा दिवसातून 2 ते 3 वेळा वापर करा आणि फेस पॅक लावा. रात्री झोपण्याआधी चेहरा धुवून आणि रोज रात्री ही प्रक्रिया करावी लागेल. सकाळी आणि रात्री हे करा.
दुसरा दिवस
आता तुम्हाला तुमच्या स्कीनला आतून हेल्दी करण्याचं काम करायचं आहे. जंक फूड, तळलेले पदार्थ हे सगळं सोडावं लागेल आणि जास्तीत जास्त फळांचं सेवन करावं लागेल. या फळांनी स्कीन आतून पोषक होईल आणि त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.
तिसरा दिवस
आता तुम्हाला तुमच्या स्कीनवर खास काम करायचं आहे. त्यासाठी स्कीन टाईपनुसार, स्क्रब, टोनर, मॉईस्चरायझर, सनस्क्रीन लावा. सर्वातआधी चेहरा धुवूल घ्या, त्यानंतर स्क्रबने 10 ते 15 मिनिटे चेहऱ्याची मसाज करा. चेहरा साफ करण्यासाठी टोनर लावा आणि काही वेळासाठी तसेल लावून ठेवा. आता चेहरा स्वच्छ करुन मॉईस्चरायझर लावा आणि सनस्क्रीन दोन्ही एकत्र करुन लावा.
चौथा दिवस
रोजप्रमाणे चेहरा क्लीन्जरने स्वच्छ करा, हवं असेल तर स्क्रब करा. त्यानंतर 10 मिनिटासाठी स्टीम घ्या. स्टीम घेतल्यानंतर चेहरा स्वच्छ करा आणि नंतर फेस पॅक लावा. हे फेस पॅक 20 ते 25 मिनिटांसाठी तसेच राहू द्या.
पाचवा दिवस
चेहरा क्लीन्ज आणि मॉईस्चराईज केल्यानंतर अॅलोव्हेराचा वापर करा. अॅलोव्हेरा जेल किंवा फ्रेश अॅलोव्हेरा आणून त्याने चेहऱ्याची मसाज करा. 3 ते 4 मिनिचे मसाज करा. डोळ्यांखाली एक्स्ट्रा अॅलोव्हेरा लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ करा. सायंकाळी चेहऱ्याला चंदनचा फेस पॅक किंवा दूधात चंदन मिश्रित करुन लावा.
सहावा दिवस
सहाव्या दिवशी फळांचा ज्यूस घ्या. फ्रेश फळांचा रस घरीच बनवा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. तुम्हाला हवं असेल तर फळांचा रस तिसऱ्या दिवसापासूनच पिणे सुरु करा. याने लवकर ग्लो मिळेल. ज्यूससोबत पाणीही अधिक प्रमाणात प्यायला हवे.
सातवा दिवस
सातव्या दिवशीही फळे खा. जंक फूडपासून दूर रहा, पाणी प्या आणि स्कीनला हायड्रेट करण्याचा प्रयत्न करा. सातव्या दिवशी तुम्हाला चेहरा ग्लो झालेला दिसेल.