भुवयांना आकार देताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:02 AM2018-08-10T11:02:16+5:302018-08-10T11:07:06+5:30
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्यातही जर भुवया चेहऱ्याच्या आकारानुसार नीट नसतील, जास्त मोठ्या किंवा जास्त बारिक झालेल्या असतील तरीदेखील चेहऱ्याचा लूक खराब दिसतो. त्यामुळे थ्रेडिंग करताना त्या नीट कोरणं गरजेचं असून त्यामुळे चेहऱ्याला एक अॅट्रॅक्टिव लूक मिळतो. जर तुम्हाला प्रत्येक वेळी भुवयांचा शेप परफेक्ट पाहिजे असेल तर त्या कोरताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
1. या पद्धतीने करा थ्रेडिंग
जेव्हाही तुम्ही पार्लरमध्ये थ्रेडिंग करण्यासाठी जात असाल तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. थ्रेडिंग करताना भुवयांचे केस जास्त कोरू नका. त्याचप्रमाणे दोन्ही भुवयांच्यामध्ये जास्त गॅप ठेवू नका आणि भुवयांच्या दोन्ही टोकांवरून फक्त एक्स्ट्रा केसचं रिमूव्ह करा.
असे केल्यानं तुमच्या भुवया परफेक्ट शेपमध्ये दिसतील.
2. भुवयांसाठी असणारी आयब्रो पेन्सिल
जर तुम्ही स्वतःच भुवयांना योग्य आकार देण्याचा विचार करत असाल तर, आयब्रो पेन्सिलचा रंग निवडताना काळजी घ्या. हा रंग तुमच्या भुवयांच्या रंगाशी मिळता जुळता असला पाहिजे. जर तुम्ही रंग निवडताना कनफ्यूज असाल तर नेहमी डार्क रंगाचीच निवड करा. जर तुमच्या भुवयांच्या केसांचा रंग ब्राऊन असेल तर त्यासाठी डार्क ब्राऊन रंगाच्या आयब्रो पेन्सिलची निवड करा. त्यामुळे भुवयांचा रंग नॅचरल दिसण्यास मदत होईल.
3. मेकअपचा बेस लावल्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर
मेकअप करतानाच भुवयांसाठी आयब्रो पेन्सिलचा वापर करत असाल तर, चेहऱ्यावर कंसीलर, फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करा आणि त्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर करा. जर पहिल्यांदा आयब्रो पेन्सिलने भुवया नीट केल्या तर फाउंडेशन किंवा कंसीलर लावताना आयब्रो पेन्सिलचा रंग पसरण्याची शक्यता असते.
4. भुवया ब्लेंड करण्याची पद्धत
जेव्हाही तुम्ही भुवयांना आकार देत असाल किंवा त्यांवर रंग फिल करत असाल तर त्याना जास्त डार्क करू नका. कारण त्यामुळे तुमचा नॅचरल लूक बिघडण्याची शक्यता असते. पेन्सिलने भुवयांच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये अलगद स्ट्रोक करा. त्यामुळे नॅचरल लूक तसाच राहिल.