हिवाळ्यात गोबरे, गुलाबी गाल हवे आहेत, तर या खास टीप्स नक्की देतील सुंदर त्वचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:23 AM2019-11-26T10:23:03+5:302019-11-26T10:42:43+5:30
हिवाळ्यात सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात. पण थंडिचे वातावरण असताना अनेकदा चेहरा शुष्क आणि कोरडा पडतो.
(Image credit-Female adda)
हिवाळ्यात सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात. पण थंडिचे वातावरण असताना अनेकदा चेहरा शुष्क आणि कोरडा पडतो. आणि त्वचा हवी तशी मेंऩ्टेन राहत नाही. त्यामुळे चांगली त्वचा मिळवण्यासाठी अनेकदा महिला महागड्या उत्पादनांचा वा़पर करतात. सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेकांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. तर या काही घरगुती गोष्टींचा वापर करुन तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. त्यासाठी वाचा या काही खास टीप्स.
(image credit-You tube)
१) कोमट पाण्याने चेहरा धुवा
(Image credit- The spruce)
कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास रक्तप्रवाह चांहला राहतो. त्यामुळे गाल टवटवीत राहतात. आणि चेहरा उजळतो. कोमट पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर केल्यास हरकत नाही
२) काकडी
काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवते. काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यांपासुन दूर ठेवण्यात मदत करते. जसे की, टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.
३) संतुलीत आहार
(Image credit- Activekids)
वीटामीन सी चा समावेश असणाऱ्या भाज्या आणि फळांचा समावेश असावा. द्राक्षं, संत्री यांसारख्या रसाळ फळांचा समावेश आहारात करा. जेवणाच्या वेळा चुकवू नका. बाहेरचे आणि तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा.
४) भरपूर पाणि प्या
साधरणपणे दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणि प्या. त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही. तसेच ओठ,गाल मुलायम राहतील. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. परीणामी शरीरातील अशुद्धता घामातून बाहेर पडण्यास मदत होते.
५) नियमीत व्यायाम करा.
(Planet fitness)
व्यायाम करायला खूप लोकं कंटाळा करतात. पण नियमीत व्यायाम केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळील राहील. घामामुळे शरीरातील टॉक्जीन्स निघून जातात. त्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं. गालं गोबरे दिसतात. याशिवाय शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवांची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते. त्यामुळे ते स्नायू बळकट होतात.