चेहऱ्यावर गुलाबी ग्लो आणण्यासाठी या टिप्स फॉलो करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:36 PM2018-09-03T17:36:11+5:302018-09-03T17:37:31+5:30
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेकदा मेकअपचा आधार घेण्यात येतो. चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळे, ओठ, आयब्रो यांचं फार महत्त्व आहे. अशातच गुलाबी गालांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेकदा मेकअपचा आधार घेण्यात येतो. चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळे, ओठ, आयब्रो यांचं फार महत्त्व आहे. अशातच गुलाबी गालांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. मेकअपमुळे गालांवर गुलाबी ग्लो आणणं सहज शक्य असतं. परंतु, मेकअप प्रोडक्ट्समुळे चेहऱ्याला नुकसानही पोहचू शकते. अशातच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्या घरी चेहऱ्यावर गुलाबी छटा आणण्यासाठी काही टिप्स...
- दोन केळी बारिक करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. चेहऱ्यावर गुलाबी ग्लो आणण्यासाठी हा फस पॅक फार फायदेशीर ठरेल.
- काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.
- चेहऱ्याला दूध आणि लिंबाच्या रसाने मसाज केल्यानंतर चेहऱ्यावरी रक्तप्रवाह वाढतो. गालांवर गुलाबी ग्लो येण्यास मदत होते.
- बारिक केलेल्या बदामाची पेस्ट, वाटलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, पुदिन्याच्या रस आणि मध एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
- हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचा साफ राहिल आणि गालांवर गुलाबी ग्लो येण्यासाठी मदत होईल.
- सफरचंदाचं व्हिनेगर कापसाच्या बोळ्यावर घेऊन गालांवर लावल्याने गालांवर ग्लो येण्यास मदत होईल.