डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:30 PM2018-08-23T17:30:44+5:302018-08-23T17:31:14+5:30

डोळ्यांखाली कोलेस्ट्रॉल जमा होणं म्हणजे मधुमेह, लिव्हर संबंधीच्या समस्या, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं यांसारख्या समस्या असू शकतात. डोळ्यांच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. 

How to get rid cholesterol deposits around your eyes | डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!

डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!

googlenewsNext

जास्त प्रामाणात कोलेस्ट्रॉल शरीरात जमा होणं शरीरासाठी घातक असतं. पण तुम्हाला माहीत आहे का? चेहऱ्यावरही कोलेस्ट्रॉल जमा होतं. जेव्हा चेहऱ्यावर कोलेस्ट्रॉल जमा होतं जातं त्यावेळी चेहऱ्यामध्ये अनेक बदल घडून येतात. जेव्हा चेहऱ्यावर कोलेस्ट्रॉल जमा होतं, त्यावेळी  डोळ्यांखाली कोलेस्ट्रॉल जमा होतं. डोळ्यांखाली कोलेस्ट्रॉल जमा होणं म्हणजे मधुमेह, लिव्हर संबंधीच्या समस्या, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं यांसारख्या समस्या असू शकतात. डोळ्यांच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानं चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. 

जाणून घेऊयात डोळ्यांखाली जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घरगुती उपायांबाबत...

लसूण

लसणाचा वापर करून शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. याव्यतिरिक्त डोळ्यांखाली जमा झालेला कोलेस्ट्रॉलचा थर कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो. डोळ्यांखाली 15 मिनिटांसाठी लसणाची पेस्ट लावून 15 मिनिटांपर्यंत डोळे बंद ठेवा. त्यामुळे डोळ्यांखाली असलेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. 

मेथी

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचाही वापर करण्यात येतो. रात्रभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजवावे. त्यानंतर सकाळी अनोशापोटी ते पाणी प्यावे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. डोळ्यांखाली मेथीच्या दाण्यांची पेस्ट लावल्यानेही फायदा होतो. 

केळ्याची साल

घरगुती उपायांनी डोळ्यांखाली जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केळ्याची साल हा उत्तम पर्याय आहे. कारण केळ्याच्या सालीमध्ये त्वचेसाठी उपयोगी असलेले अॅन्टीऑक्सिडंट असतात. याचा वापर करून केळ्याच्या सालीच्या तुकड्यांमध्ये कापून डोळ्यांखाली मसाज करा. त्यानंतर 30 मनिटांनी चेहरा धुवून घ्या. 

दूध 

दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हे फार गुणकारी ठरतं. रात्री झोपण्याआधी कापसाच्या बोळा दुधामध्ये भिजवून दाग असलेल्या जागेवर लावा. रात्रभर तसंच ठेवा. सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

दही

दही दुधापासून तयार करण्यात आलेलं असतं. त्यामुळे त्यामध्येही लॅक्टिक अॅसिड असतं ते ब्लिचिंग एजेन्टचा काम करतं.  एका वाटीमध्ये दही घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

Web Title: How to get rid cholesterol deposits around your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.