चेहऱ्यावर आलेली सूज कशी कमी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:06 PM2019-09-09T15:06:29+5:302019-09-09T15:16:55+5:30

चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी सूज येऊ शकते जसे की, इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं इत्यादी. याने चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच तुमची चिंताही वाढते.

How to get rid of a puffy face | चेहऱ्यावर आलेली सूज कशी कमी कराल?

चेहऱ्यावर आलेली सूज कशी कमी कराल?

googlenewsNext

(Image Credit : facialhealth.org)

चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी सूज येऊ शकते जसे की, इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं इत्यादी. याने चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच तुमची चिंताही वाढते. अनेकांना वाटत असतं की, ते जाड झालेत किंवा त्यांचं वजन वाढलं. पण कारण वेगळंच असतं. जर तुम्ही चेहऱ्यावर येणाऱ्या सूजेमुळे हैराण असाल तर यावर काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सामान्य उपायांनी चेहऱ्यावरील सूज दूर होऊ शकते.

अल्कोहोल कमी आणि पाणी जास्त सेवन करा

(Image Credit : sanfordhealth.org)

तुमच्या चेहऱ्यात होणारे जास्तीत जास्त बदल हे वॉटर रिटेंशन याकारणाने होतात. एल्कोहोल वॉटर रिटेंशनची(शरीराच्या अंगांमध्ये पाणी जमा होणं) समस्या अधिक वाढवतं. कारण याने तुम्ही डिहायड्रेट होता. त्यामुळे अल्कोहोलचं सेवन कमी करून पाणी अधिक सेवन करा.

पुरेशी झोप घ्या

(Image Credit : jgilbertfootwear.com)

कमी झोप घेतल्याने केवळ तुमचं इम्यून सिस्टीमचं प्रभावित होतं असं नाही तर याने चेहऱ्यावर सूज येते आणि चेहरा फुगलेला दिसतो. कमी झोपेमुळे अनेकप्रकारचे हार्मोन प्रभावित होतात, ज्यामुळे हार्मोन योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत. याने शरीरात इंफ्लेमेशन होतं. या कारणाने चेहऱा फूगलेला आणि सूजलेला वाटतो.

सोडियम आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचं सेवन करू नका

जर तुम्ही जास्त मीठ असलेले पदार्थ किंवा अधिक कार्बोहायड्रेट पदार्थांचं सेवन करत असाल तर शरीरात तरल पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे इंफ्लेमेशन वाढत आणि चेहरा सूजतो. त्यामुळे सोडियम आणि कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ सेवन करणे बंद करा.

सक्रिय रहा

(Image Credit : mnn.com)

तज्ज्ञांचं मत आहे की, जास्तीत जास्त शारीरिक हालचाल केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते आणि याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावरही बघायला मिळतो. त्यामुळे एक्सरसाइज आणि इतर फिजिकल अ‍ॅक्टिविटी करत रहा.

अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी खाद्य पदार्थांचं सेवन करा

(Image Credit : cookinglight.com)

आहारात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी खाद्य पदार्थ जसे की, आलं, नारळ, हळद इत्यादींचा समावेश करा. या पदार्थांमुळे शरीरातील सूज कमी होते. 

Web Title: How to get rid of a puffy face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.