पिंपल्सपेक्षा जास्त त्रासदायक असतात ब्लाइंड पिंपल्स, बचावासाठी करा हे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:47 PM2018-12-11T12:47:14+5:302018-12-11T12:47:54+5:30
ब्लाइंड पिंपल्स हा पिंपल्सचाच एक प्रकार आहेत, पण हे जरा वेगळे असतात. सामान्य पिंपल्स त्वचेच्या वरच्या भागात विकसीत होतात, जे सहजपणे पाहिजे जाऊ शकतात.
(Image Credit : beyoungaholic.com)
ब्लाइंड पिंपल्स हा पिंपल्सचाच एक प्रकार आहेत, पण हे जरा वेगळे असतात. सामान्य पिंपल्स त्वचेच्या वरच्या भागात विकसीत होतात, जे सहजपणे पाहिले जाऊ शकतात. पण ब्लाइंड पिंपल्स त्वचेच्या आत विकसीत होतात. त्यामुळे ते तुम्हाला केवळ त्वचेवरील गाठीच्या रुपात जाणवतात. या पिंपल्सकडे दुर्लक्ष तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे या ब्लाइंड पिंपल्सबाबत आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
ब्लाइंड पिंपल्स होण्याची कारणे
ब्लाइंड पिंपल्स त्वचेच्या आतील बॅक्टेरियामुळे तयार होतात. त्यासोबतत तेलकट त्वचा, मोठी रोमछिद्रे झाल्यानेही बॅक्टेरिया त्वचेच्या आतील भागात जातात आणि यामुळे ब्लाइंड पिंपल्स होतात. हे पिंपल्स त्वचेच्या आत असल्याने दूर होण्यास बरेच दिवस लागू शकतात. पण जर हे त्वचेच्या वरच्या भागात असतील तर त्यावर लगेच उपाय केले जाऊ शकतात.
ब्लाइंड पिंपल्सपासून बचाव
ब्लाइंड पिंपल्स हे सामान्य पिंपल्सप्रमाणे दिसत नाही. त्यामुळे त्यांना दाबण्याची किंवा खाजवण्याचा प्रयत्न अजिबात करु नये. अनेकदा ब्लाइंड पिंपल्सची गाठ दाबल्याने त्वचा खराब होते. काही उपाय करुन तुम्ही या ब्लाइंड पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊया काही उपाय....
वार्म कम्प्रेस
वार्म कम्प्रेस म्हणजेच गरम शेक दिल्याने ब्लाइंड पिंपल्स दूर करण्यात मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याने पिंपल्समध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात. तसेच गरमीमुळे तुमच्या त्वचेची रोमछिद्रे मोकळी होण्यास मदत मिळते. यामुळे पिंपल्स त्वचेवर येतात. त्यासोबतच याने बॅक्टेरिया त्वचेच्या बाहेर येण्यासही मदत मिळते.
बेंजोइल पेरोक्साइड क्रीम
पिंपल्सच्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी तुम्ही बेंजोइल पेरोक्साइड क्रीमचा वापर करु शकता. मात्र याचा वापर त्वचेवर दिसणाऱ्या पिंपल्सवर करु नये. तसेच काळे डाग असलेल्या भागाला मॉइश्चराइज करणेही गरजेचे आहे.
सलिसीक्लिक अॅसिड
सलिसीक्लिक अॅसिड पिंपल्स दूर करण्यासाठी चांगला पर्याय मानलं जातं. तुम्ही या अॅसिडचं क्लींजर चेहऱ्यावर वापरु शकता. जर तुमची त्वचा कोरडी किंवा फार संवेदनशील असेल तर क्लींजर केवळ पिंपल्स असलेल्या भागातच लावा.
आइस क्यूब
जर पिंपल्समुळे तुम्हाला फार जास्त वेदना होत असतील तर आइस थेरपी तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी आधी सलिसीक्लिक अॅसिडने चेहरा स्वच्छ करा आणि आइस बॅग १ तासातून २ ते ३ वेळा पिंपल्सवर लावा. याने पिंपल्स थंड होतील आणि तुम्हाला आराम मिळेल.
शुद्ध मध
मध हे पिंपल्सच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. मधात नैसर्गिक अॅंटीमायक्रोबायल गुण असतात, जे बॅक्टेरियापासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. त्यासाठी मध हे पिंपल्स झालेल्या जागेवर लावा आणि रात्रभर तसंच ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.