बाजारातील लिपस्टिकला म्हणा बाय-बाय; घरीच तयार करा ओठांसाठी फायदेशीर लिपस्टिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 11:52 AM2018-10-28T11:52:50+5:302018-10-28T12:00:42+5:30
आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील स्किनच्या समस्या दूर करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतंच पण ओठांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते.
आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील स्किनच्या समस्या दूर करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतंच पण ओठांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते.
महिलांच्या मेकअप किटमध्ये असणारं सर्वात महत्वाचं प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक. ओठांचं सौंदर्य खुलवण्यासाठी विविध रंगाच्या आणि प्रकारांच्या लिपस्टिक वापरण्यात येतात. बाजारामध्ये विविध ब्रँडच्या लिपस्टिक आढळून येतात. परंतु या लिपस्टिक तयार करण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यातील काही केमिकल्स ओठांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात.
ओठांचा रंग काळपट होणं, स्किन खराब होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजारातील लिपस्टिकऐवजी तुम्ही घरच्या घरी लिपस्टिक तयार करू शकता. त्यासाठी बीटाचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्व स्किनचा काळपटपणा दूर करून मूळ रंग पर आणण्यास मदत करतात. जाणून घेऊयात घरच्या घरी सोप्या पद्धतीने लिपस्टिक तयार करण्याबाबत...
साहित्य :
- एक बीट
- खोबऱ्याचं तेल
- मिक्सर
- गाळणी
- छोटी वाटी (काचेची)
बीटापासून लिपस्टिक तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी बीट धुवून त्याची साल काढा. त्यानंतर त्याचे छोटे छोट तुकडे करून मिक्सरमधून बारिक करून घ्या. त्यामध्ये पाणी टाकू नका.
- तयार झालेली पेस्ट एका काचेच्या वाटीमध्ये काढून घ्या. पेस्ट पूर्ण बारिक झाली आहे याची खात्री करून घ्या.
- वाटीमध्ये काढलेल्या पेस्टमध्ये एक चमचा नारळाचं तेल मिक्स करा. फार कमी तेल टाकलं तर लिपस्टिक ड्राय होईल त्यामुळे एक चमचा किंवा थोडं जास्त तेल मिक्स करू शकता.
- पेस्टमध्ये नारळाचं तेल मिक्स करण्यासाठी चमच्याचा किंवा टूथपिकचा वापर करा. त्यानंतर ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा.
- फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ही पेस्ट थोडी घट्ट झाल्यावर एखाद्या लिपबामच्या कंटेनरमध्ये काढून घ्या.
- कंटेनरमध्ये काढल्यानंतर पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून द्या. साधारणतः 2 ते 3 तासांनंतर तुम्ही ही लिपस्टिक वापरू शकता.