हिवाळ्यामध्ये ओठांना सॉफ्ट बनवण्यासाठी तयार करा कोकोनट लिप बाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:49 PM2018-10-30T19:49:30+5:302018-10-30T19:50:48+5:30
थंडीमध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सर्वांना एका समस्येचा प्रामुख्याने सामना करावा लागतो, तो म्हणजे फाटणाऱ्या ओठांचा. बाजारामध्ये मिळणाऱ्या लिप बाममुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यास मदत होते.
थंडीमध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सर्वांना एका समस्येचा प्रामुख्याने सामना करावा लागतो, तो म्हणजे फाटणाऱ्या ओठांचा. बाजारामध्ये मिळणाऱ्या लिप बाममुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यास मदत होते. पण यामध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्सचा ओठांच्या स्किनवर परिणाम होतो. याच्या अतिवापरामुळे ओठ काळे होतात. अशावेळी घरी तयार केलेला लिप बाम लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे ओठांच्या त्वचेला नुकसानही पोहोचत नाही आणि ओठ मुलायम होण्यासही मदत होते. जाणून घेऊयात लिप बाम घरच्या घरी तयार करण्याच्या पद्धती...
1. कोकोनट ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल
साहित्य :
खोबऱ्याचं तेल - 1 चमचा
ऑलिव्ह ऑईल - 1 चमचा
कारनोबा वॅक्स - 1 चमचा
लिप बाम तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी खोबऱ्याचं ऑइल, ऑलिव्ह ऑईल आणि कारनोबा वॅक्स एकत्र करा.
- गॅसवर एक भांड ठेवून हे मिश्रण वितळवून घ्या.
- त्यानंतर एका कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.
- 2 ते 3 तसानंतर हा लिपबाम वापरण्यासाठी तयार आहे.
2. कोकोनट ऑइल आणि शिया बटर
साहित्य :
खोबऱ्याचं तेल - 1 चमचा
कारनोबा वॅक्स - 1 चमचा
शिया बटर - 1 चमचा
लिप बाम तयार करण्याची कृती :
- खोबऱ्याचं ऑइल, कारनोबा वॅक्स आणि शिया बटर एकत्र करून घ्या.
- एक भांडं गॅसवर ठेवून हे मिश्रण वितळवून घ्या.
- वितळल्यानंतर एका लिपबामच्या कंटेनरमध्ये थंड करून घ्या.
- त्यानंतर दररोज या लिपबामचा वापर करा.
- यामुळे तुमचे ओठ मुलायम होतील.
3. खोबऱ्याचं तेल आणि जोजोबा ऑइल
साहित्य :
खोबऱ्याचं तेल - 1 चमचा
जोजोबा ऑइल - 5 ते 6 थेंब
लिप बाम तयार करण्याची कृती :
- मंद आचेवर सर्वात आधी खोबऱ्याचं तेल गरम करत ठेवा.
- त्यानंतर यामध्ये जोजोबा ऑईलचे 5 ते 6 थेंब मिक्स करा.
- त्यानंतर पुन्हा हे मिश्रण मिक्स करा.
- एका कंटेनरमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवा.
- लिप बाम वापरण्यासाठी तयार आहे.