ऑलिव्ह ऑइल बॉडी वॉशचा कधी वापर केलाय? असं करा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:13 PM2019-03-07T13:13:10+5:302019-03-07T13:24:00+5:30

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणे यापेक्षा चांगला उपाय नाही. सामान्यपणे लोक आंघोळ करण्यासाठी साबणाचा वापर करतात.

How make homemade olive oil body wash | ऑलिव्ह ऑइल बॉडी वॉशचा कधी वापर केलाय? असं करा तयार

ऑलिव्ह ऑइल बॉडी वॉशचा कधी वापर केलाय? असं करा तयार

googlenewsNext

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणे यापेक्षा चांगला उपाय नाही. सामान्यपणे लोक आंघोळ करण्यासाठी साबणाचा वापर करतात. पण शॉवर जेलचा वापर करून तुम्ही हा अनुभव आणखी वेगळ्याप्रकारे घेऊ शकता. शॉवर जेलची आयडिया काही लोकांना आवडणार नाही, पण एकदा ट्राय करायला हरकत नाही. शॉवर जेलने त्वचा साबणाच्या तुलनेत अधिक मुलायम होईल असे सांगितले जाते. 

मार्केटमध्ये तुम्हाला शॉवर जेलचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळते. पण जर तुम्हाला शॉवर जेल घेणे परवडत नसेल तर तुम्ही घरीच शॉवर जेल तयार करू शकता. याने तुमचे पैसेही वाचतील आणि वेळही वाचेल.

स्वत: घरी तयार केलेला शॉवर जेल हा बाजारात मिळणाऱ्या शॉवर जेलपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतो. आम्ही तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने शॉवर जेल कसा तयार करायचा हे सांगणार आहोत.

साहित्य

मध

ऑलिव्ह ऑइल

लिक्विड कॅसाइल साबण

एसेंशिअल ऑइल(तुम्हाला आवडेल ते)

कसं कराल तयार?

सर्वातआधी ऑलिव्ह ऑइल तुमच्या पसंतीच्या कोणत्याही एसेंशिअल ऑइलमध्ये मिश्रित करा. नंतर हे एका काचेच्या भांड्यात टाका, त्यात मध आणि लिक्विड कॅसाइल साबण मिश्रित करा. हे मिश्रण सूर्यकिरणांपासून दूर थंड जागेवर ठेवा. आंघोळ करताना ओल्या स्पंज किंवा कापडावर याचे काही थेंब टाका आणि याचा शरीरावर वापर करा. हे योग्य प्रकारे स्टोर केलं गेलं तर ७ ते १० दिवसांपर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो. 

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायजर म्हणून काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेल्या अ‍ॅंटी एजिंग तत्वामुळे वाढत्या वयाच्या खूणा जसे की, सुरकुत्या, काळे डाग, बारीक रेषा दिसणार नाही. या ऑइलमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट सुद्धा असतं. याने त्वचेचं आरोग्य चांगल राहण्यास मदत होते. 

मधाचे फायदे

मधामुळे त्वचा हायड्रेट होते आणि सोबतच त्वचा मुलायमही राहते. अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेला इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतं. चमकदार आणि हेल्दी त्वचेसाठी मधाचा वापर तुम्ही रोज करू शकता. 

लिक्विड कॅसाइल साबणाचे फायदे

लिक्विड कॅसाइल साबणामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात, ज्याने त्वचेचा कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आणि अ‍ॅलर्जीपासून बचाव केला जाऊ शकतो. 

एसेंशिअल ऑइलचे फायदे

तुम्ही या शॉवर जेलमध्ये वापरण्यासाठी कोणत्याही एसेंशिअल ऑइलचा वापर करू शकता. याने शरीराला आराम मिळू शकतो. याने सुगंध वाढवण्यासही मदत होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: How make homemade olive oil body wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.