मेकअप रिमुव्हरसाठी खर्च कशाला? घरीच तयार करून मिळवा चमकदार चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 04:20 PM2020-02-26T16:20:20+5:302020-02-26T16:49:01+5:30
मेकअप केला म्हणजे जो काढावा लागणार आणि न काढता तसेच झोपलात तर चेहरा खराब होऊ शकतो. किंवा यामुळे वयाआधीच मुली म्हातारं असल्यासारखं दिसतात.
आपण बाहेर जाताना नेहमी मेकअप करून घराबाहेर पडतो. अगदी रोज नाही तरी काही खास प्रसंग किंवा स्पेशल व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर आपण हलका का होईना मेकअप करतो. काही महिलांना स्किन प्रोब्लेम असतात. किंवा त्वचेवर जास्त पुळया आणि काळे डाग असल्यामुळे रोज मेकअप करावाच लागतो. मेकअप केला म्हणजे जो काढावा लागणार आणि न काढता तसेच झोपलात तर चेहरा खराब होऊ शकतो. किंवा यामुळे वयाआधीच मुली म्हातारं असल्यासारखं दिसतात.
मेकअप काढण्यासाठी नेहमी बाजारात उपलब्ध असलेले महागडे मेकअप रिमूव्हर घेणं शक्य नसतं. जर कधी मेकअप रिमुव्हर घरात नसेल तर मेकअप कशाने काढायचा हा प्रश्न पडतो. जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडत असेल तर आज आम्ही तुम्हाला मेकअप रिमुव्हर घरच्याघरी कसं तयार करायचं याबाबत सांगणार आहोत. किंवा घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींना तुम्ही त्वचेवरचा मेकअप मिटवू शकता.
नारळाचं तेल
त्वचेला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक नारळाच्या तेलात असतात. मेकअप काढण्यासाठी नारळाचं तेल त्वचेवर लावून कापसाने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता.
बदामांच तेल
बदामाचं तेल अनेक ब्युटी प्रोडक्समध्ये वापरलं जातं. याचाच वापर करून तुम्ही आपल्या चेहरा आणि त्वचेवरचा मेकअप काढू शकता. स्किन पोर्सना साफ करून त्यातील घाण काढून टाकण्यासाठी बदामाचं तेल फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे त्वचेवरील फाईन लाईन्स सुद्धा कमी होतात. ( हे पण वाचा-खरं की काय? त्वचा आणि केसांसाठी फायद्याचं असतं घाम येणं, कसं ते वाचा...)
मध आणि एलोवेरा
मध आणि एलोवेरा या दोन पदार्थांचा वापर करून तुम्ही चेहरा चमकदार बनवू शकता. त्यासाठी एका वाटीत एलोवेरा आणि मध एकत्रज करा. त्यात दोन चमचे तुप घाला. नंतर हे मिश्रण त्वचेला लावून मसाज करा. काही वेळानी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. याशिवाय दूध, दही आणि गुलाब पाण्याचा वापर करून सुद्धा तुम्ही त्वेचवरील मेकअप काढून त्वचेवर ग्लो मिळवू शकता. ( हे पण वाचा-नाकावरच्या ब्लॅकहेट्समुळे वयस्कर दिसत असाल तर करा 'हे' घरगुती उपाय)