स्वस्तात घरीच तयार करा हे 4 महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, नैसर्गिक सौंदर्याचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 10:48 IST2018-11-05T10:47:00+5:302018-11-05T10:48:13+5:30
सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर सगळेजण करत असतात. पण या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक केमिकल्स आणि इतरही काही तत्व असतात.

स्वस्तात घरीच तयार करा हे 4 महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, नैसर्गिक सौंदर्याचं गुपित!
सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर सगळेजण करत असतात. पण या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक केमिकल्स आणि इतरही काही तत्व असतात. त्यामुळे यांचा अधिक वापर केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं. पण जर तुम्हाला त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवायचं असेल तर हानिकारक केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सला बाय-बाय करा आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा. अशाच काही घरी तयार करता येणाऱ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सच्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लिप ग्लॉस
बाजारातून महागडे लिप ग्लॉस खरेदी करण्यापेक्षा घरीच स्वस्तात तुम्ही हे तयार करु शकता. याने तुमची पैशांची बचतही होईल आणि त्वचेवर त्याचा वाईट परिणामही होणार नाही. हे तयार करण्यासाठी एका स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे स्मॅश करुन पेस्ट तयार करा. आता यात ३ मोठे चमचे खोबऱ्याचं तेल टाका आणि २ चमचे ग्लिसरीन टाका. हे चांगल्याप्रकारे एकत्र करुन एका डबीमध्ये काढा. या नैसर्गिक ग्लॉसने तुमच्या ओठांना नैसर्गिक सौंदर्य मिळेल.
होममेड फाउंडेशन
जर तुम्ही रोज फाउंडेशनचा वापर करत असाल तर हे बाजारातून विकत घेण्यापेक्षा घरीच तयार करु शकता. घरीच फाउंडेशन तयार करण्यासाठी सर्वातआधी १ चमचा जोजोबा ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईल घ्या. आता १ चमचा आरारोट पावडर आणि १ चमचा दालचीनी पावडर मिश्रित करा. यात ते टाकून पेस्ट तयार करा. या फाउंडेशनने तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक लूक मिळेल.
आयलायनर तयार करा
चेहऱ्याचं सौंदर्य हे अधिक प्रमाणात डोळ्यांवर अवलंबून असतं. जेवढे आकर्षक डोळे, तितके तुम्ही सुंदर दिसाल. त्यामुळे डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यसाठी घरीच काजळ आणि आयलायनर तयार करा. यासाठी थोडे बदाम घ्या आणि ते जाळा. इतके की ते कोळशासारखे झाले पाहिजेत. ते बारीक करुन त्यात बदाम तेल किंवा जोजोबा तेल मिश्रित करा. याची एक घट्ट पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुम्ही काजळ किंवा आयलायनर म्हणून वापरु शकता.
घरीच बनवा ब्लशर
ब्लशरमुळे तुमच्या गालांची सुंदरता वाढते. याच्या वापराने तुमची स्माईल आणखी आकर्षक होते. हे तयार करण्यासाठी अर्धा चमचा अरारोड पावडर घ्या. गुलाबी रंगत आणण्यासाठी यात अर्धा चमचा हिविस्कस पावडर मिश्रित करा. तुमच्या चेहऱ्याच्या टोननुसार तुम्ही हिविस्कसचं प्रमाण कमी-जास्त करु शकता. याने तुमचा चेहरा ओव्हर मेकअपही दिसणार नाही.