उन्हाळ्यात होममेड हर्बल शॅम्पूचा वापर बरा, केसांचा फंगसपासून बचाव करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:21 PM2019-04-23T13:21:30+5:302019-04-23T13:24:52+5:30
प्राचीन काळापासूनच कडूलिंबाचा वापर औषधासारखी केला जातो. कडूलिंबाच्या वापराने वेगवेगळ्या आजारांना दूर केलं जाऊ शकतो.
प्राचीन काळापासूनच कडूलिंबाचा वापर औषधासारखी केला जातो. कडूलिंबाच्या वापराने वेगवेगळ्या आजारांना दूर केलं जाऊ शकतो. उन्हाळ्यात तर वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढत असतात. या समस्या दूर करण्यासाठी देखील कडूलिंबाचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापर करु शकता. चला जाणून घेऊ कसा...
उन्हाळ्यात केसांमध्ये कोंडा, घाम यामुळे फंगस जमा होतं. त्यामुळे अनेकजण केस हेल्दी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर करतात. पण शॅम्पूमध्ये असलेल्या वेगवेगळ्या केमिकल्समुळे केस डॅमेज होतात. केस चमकदार करण्यासाठी आणि फंगसपासून बचाव करण्यासाठी काही होममेड हर्बल शॅम्पूचा तुम्ही वापर करु शकता.
हर्बल कडूलिंबाचा शॅम्पू कसा कराल तयार?
- कडूलिंबाचा शॅम्पू तयार करण्यासाठी २ कप कडूलिंबाची पाने वाळवून त्यांचं पावडर तयार करा. अर्धा किलो बेसन, अर्धा किलो शिकेकाई पावडर किंवा १२५ ग्रॅम चंदन पावडर घ्या.
- या सर्व गोष्टी एकत्र करुन एका एअरटाइट डब्यात ठेवा.
- ज्या दिवशी तुम्हाला केसांना शॅम्पू करायचं असेल तर एक कप पाण्यात २ चमचे तयार केलेलं पावडर भिजवून शॅम्पूसारखं वापरा.
- कडूलिंबाच्या या हर्बल शॅम्पूमुळे डोक्यात होणारी खाज, कोंडा ही समस्या दूर होते.
कडूलिंबाचं तेल लावण्याचे फायदे
कडूलिंबाचं तेल केसांसाठी फार फायदेशीर असतं. यात अॅंटी-फंहल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. याने केसांच्या मुळांची स्वच्छता होते. हे तेल केसातून कोंडा दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. हे तेल केसांसाठी कंडिशनरसारखं काम करतात. पिंपल्स दूर करण्यासाठी देखील कडूलिंबाचं तेल तुम्ही वापरु शकता.
कसं कराल तयार
- कडूलिंबाचं तेल तयार करण्यासाठी कडूलिंबाच्या झाडाची पिकलेली फळं तोडा.
- ही फळं उन्हात ४ ते ५ दिवस वाळवून घ्या.
- या फळांमधील गुठळी काढा.
- या गुठळी मिक्सरमधून बारीक करुन पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट हातांनी चांगली प्रेस करुन त्यातून तेल काढा.
कडूलिंब हेअर पॅक
उन्हाळ्यात केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी आणि केस चमकदार करण्यासाठी तुम्ही हवं तर कडूलिंबाचा हेअर पॅक लावू शकता. या पॅक तयार करण्यासाठी कडूलिंबाची पावडर, हिना पावडर, दही, चहाची पावडर, कॉफी आणि लिंबाचा रस हवा.
कसा कराल तयार
१ कप कडूलिंबाचं पावडर आणि १ कप हिना पावडर, १ चमचा दही, अर्धा कप चहाचं पाणी, अर्धा कप कॉफी आणि १२ चमचे लिंबाचा रस एकत्र करा. यात तुम्ही थोडं मध मिश्रित करु शकता. ही पेस्ट तुम्ही डोक्यावर लावा आणि ३० मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. यासाठी थंड पाण्याचाच वापर करा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)