पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी घरीच तयार करा खास तेल, कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:28 AM2019-10-03T11:28:32+5:302019-10-03T11:29:20+5:30
रोज आपल्या केसांना धूळ, उन्हाचा आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशात वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर केसगळती आणि केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते.
रोज आपल्या केसांना धूळ, उन्हाचा आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशात वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर केसगळती आणि केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते. केस नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. हे पदार्थ पांढरे झालेले केस काळे करण्यात मदत करू शकतात. चला जाणून घेऊ पांढरे झालेले केस काळे करण्याचे उपाय...
१) आवळा पावडर आणि खोबऱ्याचं तेल
(Image Credit : chez-rama.com)
हे तेल केसाना नैसर्गिक रूपाने काळं करतं. हे तेल तयार करण्यासाठी एक वाटीमध्ये ४ चमचे खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात दोन चमचे आवळा पावडर टाका. हे मिश्रण गरम करा. १० मिनिटानंतर तेल थोडं नॉर्मल झाल्यावर केसांची मालिश करा आणि २ तासांनी केस शॅम्पूने धुवावे. या तेलाचा वापर आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा.
२) कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल
(Image Credit : parenting.firstcry.com)
हे तेल तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची काही पाने टाकून गरम करा. हे तेल नंतर थंड करून एका बॉटलमध्ये टाका. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा आणि सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा.
३) खोबऱ्याचं तेल आणि लिंबू
(Image Credit : stylecraze.com)
खोबऱ्याचं तेल गरम करून त्यात लिंबाचा रस टाका आणि या तेलाने डोक्याच्या त्वचेची हलक्या हाताने मालिश करा. सकाळी शॅम्पूने केस धुवा. या उपायाने काही दिवसातच तुम्हाला फरक बघायला मिळेल.
४) मोहरीचं तेल आणि एरंडीचं तेल
एका वाटीमध्ये एक चमचा एरंडीचं तेल आणि दोन चमचे मोहरीचं तेल टाकून गरम करा. नंतर तेल नॉर्मल झाल्यावर केसांची मालिश करा. सकाळी उठून शॅम्पूने धुवावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने केस नैसर्गिक रूपाने काळे होतील.