केसांच्या वाढीसाठी स्काल्प स्क्रब ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं तयार करायचं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 01:17 PM2020-02-14T13:17:43+5:302020-02-14T13:27:07+5:30
जेव्हा केसांची काळजी घ्यायची गोष्ट असते. तेव्हा आपण आपले केस बाहेरून कसे दिसतात.
जेव्हा केसांची काळजी घ्यायची असते. तेव्हा आपण आपले केस बाहेरून कसे दिसतात. याकडे आपण जास्त लक्ष देत असतो. पण अनेकदा आपण स्काल्प आणि केसांची त्वचा यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे स्काल्पवर पुळ्या येणे, खाज येणे, कोंडा होणे या समस्या उद्भवत असतात. स्काल्पच्या मृतपेशींना स्क्रब करून तुम्ही एक्सफोलिएट केलं तर तुम्ही केसांच्या संबंधीत अनेक समस्यांपासून वाचू शकता.
(Image credit- her zindagee)
वातावरणातील धुळ, माती, प्रदुषण यांमुळे स्काल्पच्या पोर्सवर घाण जमा होत असते. त्यामुळेच स्काल्प चांगल ठेवणं कठिण होऊन बसंत. सध्याच्या काळात वाढत जात असलेल्या प्रदूषणाच्या वातावरणात त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर घरगुती स्क्रबचा वापर करून तुम्ही चांगले केस मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा खर्च करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया केसांना अनेक फायदे मिळवून देणारं स्क्रब कसं तयार करायचं.
लिंबू आणि सी सॉल्टचे स्क्रब
(image credit-the makeup dummy)
सी सॉल्ट आणि लिंबाचं स्क्रबचा वापर करून तुम्ही एक चांगलं हेअरस्क्रब तयार करू शकता. त्यासाठी एका लहान बाऊलमध्ये ३ चमचे सी सॉल्ट. २ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. सगळयात आधी केसांवर थोडंस पाणी शिंपडा. मग हे तयार केलेलं मिश्रण एकत्र करून केसांना लावा. आपल्या स्काल्पला एक्सफोलिएट करण्यासाठी काही वेळ मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर काही वेळानी शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा.
बेकिंग सोडा आणि दालचीनी पावडर
स्काल्प स्क्रब हेअर स्क्रबसाठी बेकिंग सोडा आणि दालचीनी पावडरचा वापर करा. त्यानंतर १ चमचा दालचीनी पावडरमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण चांगलं एकत्र करा. नंतर पाण्याने केल थोडे नरम करा. नंतर या स्क्रबने केसांची मसाज करा. केसांची मसाज करून झाल्यानंतर केस शॅम्पु आणि कंडीशनरने धुवून टाका. ( हे पण वाचा- केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण)
मध आणि साखर
(image credit- youtube)
मध आणि साखरेचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. एका बाऊल मध्ये १ चमचा मध, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, ४ चमचे साखर घाला. मग थोडंस पाणी घालून हे मिश्रण एकत्र करा. या स्क्रबने केसांची मसाज करा. मग २० मिनिटांनी केस धुवून टाका. स्काल्पवरची डेड स्कीन काढून टाकण्यासाठी तसचं केसांची वाढ होण्यासाठी हे स्क्रब फायदेशीर ठरत असतं. ( हे पण वाचा-कमी वयातच त्वचेवर आलेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हे' फेशियल ठरेल इफेक्टिव्ह)